Coconut Oil: खोबरेल तेलात या २ गोष्टी मिसळून वापरा, केस आणि त्वचेला मिळतील अनेक फायदे!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coconut Oil: खोबरेल तेलात या २ गोष्टी मिसळून वापरा, केस आणि त्वचेला मिळतील अनेक फायदे!

Coconut Oil: खोबरेल तेलात या २ गोष्टी मिसळून वापरा, केस आणि त्वचेला मिळतील अनेक फायदे!

Jan 22, 2024 11:10 PM IST

Skin and Hair Care: केसांमधील कोंड्याची समस्या असो किंवा शरीरात खाज येणे, या समस्यांसाठी तुम्ही हे तेल वापरू शकता.

Benefits of Coconut Oil
Benefits of Coconut Oil (freepik)

Clove with camphor for skin: हिवाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या सर्वाधिक समस्या जास्त होतात. खाज सुटणे असो वा कोरडेपणा असो अनेकजणांना ही सेम समस्या जाणवते. या सर्व समस्यांसाठी तुम्ही नारळाचे तेल वापरू शकता. एवढेच नाही तर केसांमधील कोंड्याच्या समस्येसह त्वचेची खाज आणि बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यासही नारळाचे तेल मदत करते. फक्त नारळाच्या तेलात तुम्हाला काही गोष्टी मिक्स करून वापरायच्या आहेत. हे तेल बनवून तुम्ही खूप वेळासाठी स्टोअर करून ठेवू शकता. त्वचा आणि केसांसह अनेक समस्यांवर हे फायदेशीर ठरते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

खोबरेल तेलात मिसळा या गोष्टी

नारळाच्या तेलात कापूर आणि लवंग मिसळून वापरल्यास अनेक फायदे मिळतात. कापूर आणि लवंगा खोबरेल तेलात टाकून शिजवून घ्या. हे मिश्रण नंतर थंड करून एका डब्यात स्टोअर करा. हे तेल केस आणि त्वचेच्या समस्यांसाठी उत्तम काम करते.

Hair Care: कंबरेपर्यंत लांब आणि दाट केस हवे असतील तर आजपासूनच वापरा या गोष्टी!

केसांसाठी उपयुक्त

खोबरेल तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतो. यामध्ये कापूर आणि लवंगाचे गुणधर्म एकत्रित केल्यावर ते कोंडा साफ करण्यास आणि खाज कमी करण्यास मदत करते. याशिवाय कापूर आणि लवंग दोन्ही मिळून केसांची छिद्रे स्वच्छ करतात, घाण कमी करतात यामुळे कोंड्याची समस्या कमी होते.

Face Oil: बदामाचे तेल त्वचेसाठी आहे शक्तिवर्धक, दूर होतील सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स!

त्वचेसाठी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते

खोबरेल तेल, लवंग आणि कापूर एकत्रितपणे वापरल्यास त्वचेची खाज कमी होणाया मदत होते. हे पिंपल्स, पाठीवर येणारे पुरळ, खाज आणि कोरडेपणा हे देखील कमी करण्यास मदत करतात. त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी करतात. सोरायसिस आणि एक्जिमाच्या समस्येवर देखील हे तेल खूप फायदेशीर ठरते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner