मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Best flour for roti: गव्हाच्या पिठात या गोष्टी मिसळून बनवा चपाती,अनेक आजार दूर राहतील!

Best flour for roti: गव्हाच्या पिठात या गोष्टी मिसळून बनवा चपाती,अनेक आजार दूर राहतील!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 04, 2024 02:31 PM IST

Health Care: जर तुम्ही गव्हाचे पीठ इतर काही धान्याचे पिठ मिसळून चपाती बनवली तर ती तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Mix these things with wheat flour
Mix these things with wheat flour (freepik)

Mix different atta in wheat flour to be healthy: भारतीय स्वयंपाक घरात चपाती दिवसातून एकदा तरी बनवली जाते. अनेकांचे जेवण चपाती शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. साधारणता आपल्या स्वयंपाकघरात गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपाती मोठ्या उत्साहाने खातात. चपातीशिवाय जेवणाचे ताट पूर्ण मानले जात नाही. गव्हाचे पीठ आरोग्यदायी तर असतेच. पण त्या पिठात इतर धान्याचे पिठा मिसळून चपाती बनवली तर ती तुमच्या आरोग्यासाठी अजून उत्तम राहील. चला तर मग जाणून घेऊयात गव्हाच्या पिठात कोणते पीठ मिसळले तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहील.

गव्हाच्या पिठामध्ये काय मिसळावे?

> गव्हाच्या पिठात बेसन मिसळून चपाती बनवली तर त्यामुळे तुम्हाला जास्त प्रोटीन मिळेल. यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

> तुम्ही गव्हाच्या पिठात काळे चण्याचे पीठ मिसळूनही चपाती बनवू शकता, हे देखील तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे मधुमेहातही आराम मिळतो.

> नाचणीचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळूनही चपाती बनवल्यास त्यामध्ये असलेले घटक हाडे मजबूत करण्याचे काम करतात.

> तुम्ही सोयाबीनचे पीठही गव्हात मिसळूनही चपाती बनवू शकता.

> सत्तूचे पीठ गव्हात मिसळूनही तुम्ही चपाती बनवू शकता. किडनीसाठीही हे खूप फायदेशीर ठरू शकते.

> बाजरीचे पीठ मिसळून खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते. त्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel