मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Missing Day 2024: प्रिय व्यक्तीची आठवण अजूनही सतावत असेल तर म्हणा Miss You, पाठवा हे मॅसेज

Missing Day 2024: प्रिय व्यक्तीची आठवण अजूनही सतावत असेल तर म्हणा Miss You, पाठवा हे मॅसेज

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 20, 2024 09:24 AM IST

Missing Day Wishes: अँटी व्हॅलेंटाईन वीकमधील सहावा दिवस मिसिंग डे म्हणून ओळखला जातो. यादिवशी तुमच्या प्रिय व्यक्तींना हे मिस यू मॅसेज पाठवा.

मिसिंग डे - मिस यू मॅसेज
मिसिंग डे - मिस यू मॅसेज (unsplash)

Miss You Message and Quotes: अँटी-व्हॅलेंटाईन वीकमध्ये स्लॅप डे, किक डे, परफ्यूम डे, फ्लर्ट डे, कन्फेशन डे, मिसिंग डे आणि ब्रेकअप डे यांचा समावेश होतो. अँटी व्हॅलेंटाईन्स वीकचा सहावा दिवस मिसिंग डे म्हणून ओळखला जातो, तो २० फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्यांना एखाद्या खास व्यक्तीची आठवण येत असेल, त्यांच्या आठवणीत तळमळत असतील अशा लोकांसाठी हा दिवस चांगला असू शकतो. तुम्ही या खास मॅसेज मधून त्या व्यक्तीला मिस यू म्हणून तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

आठवण आली नाही

असं कधी झालच नाही

आठवायला विसरावं लागतं

विसरता मात्र आलच नाही

Miss You!

 

तु माझ्यापासून दूर आहेस

हृदयापासून नाही

तु माझ्या पासून दूर आहेस

डोळ्यापासून नाही

तु माझ्यापासून दूर आहेस

स्वप्नातून नाही

तु माझ्यापासून दूर आहेस

आठवणीपासून नाही

Miss You!

तुझी आठवण येण्यासाठी

काळ वेळ लागत नाही

तीही माझ्यासारखीच आहे

तिलाही तुझ्याशिवाय राहवत नाही

Miss You!

 

कधी आठवण आली तर डोळे बंद करू नकोस

कधी भेटशील त्या वळणावर

स्माइल देऊन बोलायला विसरू नकोस

कधी चुक झाल्यास माफ कर

पण पहिले प्रेम कधी विसरू नकोस

Miss You!

आता तरी सांग तुला वेळ आहे

मला तुला भेटायची ओढ आहे

आठवणीने तुझ्या व्याकुळ झालो

तुला मिठी मारायला मी आता तुझ्या स्वप्नात आलो

Miss You!

 

कुणीतरी आपल्यासाठी जेव्हा झुरत असतं

वाट पहायला लावणं तेव्हा बरं नसतं

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं

Miss You!

आज तुझ्या आठवणींमध्ये रमून रहावसं वाटतय

तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावंस वाटतंय

किती छान झाले असते जर घडाळ्याचे काटे मागे घेता आले असते

तुझ्याबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगायला मिळाले असते

Miss You!

WhatsApp channel

विभाग