what not to eat with milk: आयुर्वेदानुसार, चांगले आरोग्य राखण्यासाठी व्यक्तीने खाण्या-पिण्याशी संबंधित काही नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वात, पित्त आणि कफ या शरीरातील तीन मुख्य घटकांचे संतुलन बिघडू शकते. ज्यामुळे प्रकृती बिघडल्याने व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. आयुर्वेदाचा असाच नियम दूध आणि त्यासोबत खाल्लेल्या पदार्थांबद्दलही सांगितला गेला आहे. आयुर्वेदानुसार असे काही पदार्थ आहेत ज्यांचे दुधासोबत सेवन केल्यास दुधाचे पोषणमूल्य कमी होऊ शकते किंवा व्यक्तीचे पोट बिघडू शकते.
आयुर्वेदानुसार संत्रा, लिंबू आणि द्राक्ष यासारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन कधीही दुधासोबत करू नये. लिंबूवर्गीय फळे दुधासोबत खाल्ल्याने लिंबूवर्गीय फळांची आम्लता एखाद्या व्यक्तीला पचनाच्या समस्या निर्माण करू शकते. याशिवाय हे फूड कॉम्बिनेशन दुधाचे पौष्टिक मूल्य कमी करून कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक द्रव्यांच्या शोषणात अडथळा आणू शकतात.
मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो. दुधात आढळणारे प्रथिने केसिन पचनाशी संबंधित सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य पातळ करून पचन कमी करू शकते. ज्यामुळे दुधातील प्रथिने नीट पचत नाहीत. तर मसालेदार अन्न शरीरात आम्ल तयार करते आणि पोटाच्या आतड्यांना त्रास देते. दूध प्यायल्याने ही समस्या वाढू शकते.
दुधासह मासे खाणे टाळा. कारण मासे आणि दुधाचे वेगवेगळे परिणाम होतात. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीरात रासायनिक असंतुलन निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अपचन आणि पोट बिघडू शकते आणि आरोग्यावर ही वाईट परिणाम होऊ शकतो.
दुधासह उच्च फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने दुधाच्या पचनाची प्रक्रिया कमी होऊ शकते, संभाव्यत: सूज येणे, गॅस आणि अस्वस्थता उद्भवू शकते. दुधासोबत फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटात जडपणा तर येतोच, शिवाय पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात.
पालकसारख्या पालेभाज्यांमध्ये असलेले ऑक्सॅलिक अॅसिड दुधात असलेल्या कॅल्शियमसोबत मिसळून कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल तयार करते. या क्रिस्टलमुळे मुतखडा किंवा मूत्रमार्गात अडथळा येऊ शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या