Merry Christmas 2023: ख्रिसमसला घरी केक बनवताय? सजवण्यासाठी मदत करतील या आयडिया
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Merry Christmas 2023: ख्रिसमसला घरी केक बनवताय? सजवण्यासाठी मदत करतील या आयडिया

Merry Christmas 2023: ख्रिसमसला घरी केक बनवताय? सजवण्यासाठी मदत करतील या आयडिया

Published Dec 23, 2023 05:58 PM IST

Cake Decoration: ख्रिसमसला तुम्ही सुद्धा घरी केक बनवणार असाल तर ते डेकोरेट करण्यासाठी तुम्हाला या काही आयडिया मदत करतील. या टिप्सने तुम्ही केक सजवला तर तुमचा केक खायला टेस्टी असण्यासोबतच सुंदरही दिसेल.

ख्रिसमस केक डेकोरेशन आयडिया
ख्रिसमस केक डेकोरेशन आयडिया (unsplash)

Christmas Cake Decoration Ideas: ख्रिसमस म्हटले की पहिले डोक्यांसमोर येतो तो टेस्टी केक. ख्रिसमसला केकचे विशेष महत्त्व आहे. बरेच लोक ख्रिसमससाठी केक घरीच बनवतात. पण अनेकदा केक बनवल्यानंतर योग्य सजावट न केल्यामुळे केकची मजा कमी होते. अशा वेळी तुमची मेहनत वाया गेली असे वाटू शकते. तुम्ही ख्रिसमसला घरी केक बनवण्याचा विचार करत असाल तर तो सजवण्यासाठी या सोप्या आयडिया नक्की ट्राय करा. जेणेकरून तुमचा केक केवळ सुंदर दिसणार नाही तर त्याची चवही अप्रतिम होईल. चला तर मग जाणून घेऊया ख्रिसमस केक डेकोरेशनच्या काही आयडिया

केक आयसिंग

केकवर डेकोरेशन करण्यासाठी सर्वप्रथम आयसिंग योग्य प्रकारे करणे महत्वाचे आहे. यासाठी पिठीसाखर आणि सॉफ्ट बटर घ्या. हे दोन्ही घटक घरी सहज उपलब्ध असतात. एक कप सॉफ्ट अनसाल्टेड बटरमध्ये सुमारे २ कप पीठी साखर मिक्स करा. नंतर चांगले फेटून घ्या. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर काटा किंवा व्हिस्करच्या सहाय्याने चांगले फेटा. तुम्ही हे मिश्रण जितके फेटाल तितके ते अधिक फ्लॉपी होईल. त्यात फक्त तुम्हाला आवडेल ते व्हॅनिला इसेन्स किंवा चॉकलेट फ्लेवर घाला. कमी साहित्यात आईसिंग घरी बनवण्याची ही सर्वात सोपी रेसिपी आहे.

केकला रंगीबेरंगी बडीशेपने सजवा

व्हॅनिला फ्लेवर्ड आयसिंगसह केकला रंगीबेरंगी बडीशेपने सजवता येईल. हे खूप सुंदर दिसेल. तुम्ही यावर थोडे कलरफुल स्प्रिंकल सुद्धा स्प्रेड करू शकता.

रंगीबेरंगी चॉकलेट जेम्स

मुलांना व्हॅनिला फ्लेवरमधील रंगीबेरंगी चॉकलेट जेम्स देखील आवडतात. तुम्ही याने केक डेकोरेट करून टेस्टी आणि सुंदर बनवू शकता.

स्ट्रॉबेरी लावा

स्ट्रॉबेरी बाजारात सहज उपलब्ध असते. अर्धा केक चॉकलेटने सजवला जाऊ शकतो आणि दुसरा अर्धा व्हॅनिला सजवण्यासाठी त्यावर स्ट्रॉबेरी ठेवता येते. ते खूप सुंदर दिसेल आणि मुलांना ते खूप आवडेल.

चेरी वापरा

केकवर चेरी घालणे कॉमन आहे. तुम्ही आयसिंगमध्ये चेरी कँडी किंवा चेरी जॅम मिक्स करून केक सजवू शकता. ते अधिक टेस्टी होईल आणि मुलांना आवडेल. तसेच पांढरे आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन ख्रिसमससाठी परफेक्ट दिसेल.

कपकेक डेकोरेशन

तुम्ही केक सजवण्यासोबतच कपकेक सुद्धा सजवू शकता. यासाठी तुम्ही व्हॅनिला आयसिंग सोबत बाजारात मिळणारे कलरफुल स्प्रिंकल वापरू शकता. हे खूप सुंदर दिसते. तसेच तुम्ही पूर्ण कपकेक आयसिंग टाकून नंतर त्यावर चॉकलेट वितळवून चमच्याने साईडने टाकू शकता. हे खूप सुंदर दिसते आणि बनवायलाही सोपे आहे.

लक्षात ठेवा या टिप्स

- केक सजवण्यासाठी केकचे अनेक थरांमध्ये काप करा.

- साखर, पाणी आणि व्हॅनिला इसेन्सच्या जाड द्रावणात बुडवून बाहेर काढा. यामुळे केकचा बेस थोडा रसाळ होईल आणि त्यातील गोडवा अधिक चांगल्या प्रकारे कळेल.

- केकच्या प्रत्येक थरावर आयसिंग लावा. यामुळे चव अधिक क्रीमी आणि टेस्टी होईल.

 

- शेवटी केकवर एकत्र आयसिंग लावा. एखाद्या गुळगुळीत चमच्याने किंवा चाकूच्या मदतीने समान रीतीने स्मूद करा.

- नंतर वरचा भाग सजवा. यामुळे केक परफेक्ट दिसेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner