Symptoms of Depression: नैराश्य किंवा डिप्रेशनचे नाव ऐकताच आपल्या मनात एक उदास किंवा नि:शब्द चेहरा येतो. अनेकवेळा असे घडते की तुमच्याशी बोलणारी व्यक्ती उदास असते आणि तुम्हाला त्याबद्दल माहितीही नसते. दुःखी असणे किंवा जगण्याचा उत्साह नसणे ही मुख्यतः नैराश्याची लक्षणे मानली जातात. शिवाय अशी काही लक्षणे आहेत जी सूचित करतात की एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे किंवा तुम्ही स्वतः डिप्रेशनमध्ये जात आहात.आपापल्या आयुष्यात कधीतरी आपल्या सर्वांना दुःख आणि नैराश्य आले असेल. अपयश, संघर्ष आणि एखाद्या प्रिय व्यक्तीपासून विभक्त झाल्यामुळे दुःखी वाटणे खूप सामान्य भावना आहे. पण जर दुःख, असहाय्यता, निराशा यासारख्या भावना काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत कायम राहिल्यास ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये असल्याचे समजले जाते. याबाबतच काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
WHO च्या म्हणण्यानुसार, जगभरात ३० कोटींहून अधिक लोक डिप्रेशन अर्थातच नैराश्य या समस्येने ग्रस्त आहेत. भारतात हा आकडा ५ कोटींहून अधिक आहे. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. सामान्यतः नैराश्याची सुरुवात पौगंडावस्थेत किंवा ३० ते ४० वर्षांच्या वयात होते, परंतु ती कोणत्याही वयात होऊ शकते. पुरुषांपेक्षा महिलांना नैराश्याचा त्रास अधिक होण्याची शक्यता असते. मानसिक घटकांव्यतिरिक्त, हार्मोनल असंतुलन, गर्भधारणा आणि अनुवांशिक विकारदेखील नैराश्याचे कारण असू शकतात.
मनाशी निगडीत असलेली नैराश्याची लक्षणे सर्वांनाच माहीत आहेत. काही शारीरिक लक्षणेदेखील तुम्हाला त्रास देऊ शकतात. शारीरिक लक्षणांमध्ये, जर तुम्ही २ आठवडे दुःखी आणि शांत असाल. पुन्हा पुन्हा रडावेसे वाटत असेल. तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींमध्ये रस कमी होणे. शारीरिक लक्षणांमध्ये, तुम्हाला शरीर दुखणे किंवा बद्धकोष्ठता असू शकते. शरीरात ऊर्जा नसते, सतत पडून राहावे वाटते. दिवसभर झोपावे असे वाटते आणि रात्री झोप येत नाही. ही नैराश्याची सुरुवात असू शकते.
वजन वाढणे, भूक न लागणे किंवा जास्त खाणे. वाईट वाटणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर रडणे. कुठेही लक्ष केंद्रित करता न येणे. जीवनाचा त्याग करणे, आशा गमावणे. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वात असे बदल दिसायला लागले तर, वेळीच सावध व्हायला हवे. नेहमी बोलणारी किंवा फिरणारी व्यक्ती अचानक शांत होऊन घरातच राहू लागली. नेहमी नकारात्मक विचार करू लागली. तर त्यांच्यामध्ये नैराश्य येत असल्याचे म्हटले जाते.
जर अशी लक्षणे तुमच्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणामध्ये दिसून येत असतील तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
डोकेदुखी
जबडा आकडने
हृदयाचे ठोके वाढणे
छातीवर दाब वाटणे
सकाळी उठल्याबरोबर उलटी आल्यासारखे होणे.
सकाळी उठल्यावर पित्त झाल्यासारखे वाटणे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)