Mental Health Day: मानसिक आरोग्यासाठी दररोज करा 'ओम मेडिटेशन', कसं आणि कधी करायचं जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mental Health Day: मानसिक आरोग्यासाठी दररोज करा 'ओम मेडिटेशन', कसं आणि कधी करायचं जाणून घ्या

Mental Health Day: मानसिक आरोग्यासाठी दररोज करा 'ओम मेडिटेशन', कसं आणि कधी करायचं जाणून घ्या

Published Oct 10, 2024 03:05 PM IST

How to Maintain Mental Health: मानसिक आरोग्याबद्दल बोलणे खूप महत्वाचे आहे. अलीकडे प्रत्येकजण मानसिक आरोग्याबद्दल बोलत आहे. जणू काही कोरोना महामारीने हा प्रश्न अधिकच कठीण केला आहे.

How to Maintain Mental Health
How to Maintain Mental Health (Pexels)

How to Do Om Meditation:  कधी कधी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं बनतं की आपण आपल्या मनाचा विचार करायलाच विसरतो. हळूहळू, तणाव, चिंता आणि दुःख यासारख्या भावना आपल्या जीवनाचा एक भाग बनतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की ,या भावनांचा आपल्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो? या भावनांचा आपल्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. म्हणून, मानसिक आरोग्याबद्दल बोलणे खूप महत्वाचे आहे. अलीकडे प्रत्येकजण मानसिक आरोग्याबद्दल बोलत आहे. जणू काही कोरोना महामारीने हा प्रश्न अधिकच कठीण केला आहे. पण या विषयावर उघडपणे बोलणे महत्त्वाचे आहे.

शिवाय अशा परिस्थिती स्वतःला मजबूत बनवण्यासाठी किंवा या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विविध उपायांची गरज पडते. त्यामुळे आज आपण ओम मेडिटेशनबाबत जाणून घेणार आहोत. मानसिक आरोग्य जपण्यासाठी मेडिटेशनपेक्षा सुंदर मार्ग इतर कोणताही असू शकत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ओम मेडिटेशन विशेष फायद्याचे आहे. आज १० ऑक्टोबर रोजी 'मानसिक आरोग्य दिना'च्या निमित्ताने आपण ओम मेडिटेशनबाबत विविध गोष्टी जाणून घेणार आहोत.

मानसिक आरोग्य कसे जपावे?

या धावपळीच्या जगात तुम्हीही मानसिक आरोग्य बिघडल्याने त्रस्त असाल. आणि यातून बाहेर कस पडायचं? याची चिंता वाटतं असेल तर आता काळजी करू नका. कारण आज मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा सहज सोपा परंतु अत्यंत उपयुक्त मार्ग सांगणार आहोत. फक्त तुम्हाला संयम ठेवण्याची गरज आहे.

सकाळी करा 'हे' काम-

तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य कोणत्याही औषधांशिवाय सुधारायचे असेल तर तुमच्यासाठी मेडिटेशन हा एक उत्तम पर्याय आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन अवश्य करा. त्यातल्या त्यात ओम मेडिटेशन तुम्हाला मदत करेल. या मेडिटेशनमुळे दिवसभर तुमच्यात सकारात्मक ऊर्जा राहील. तुमचे मन प्रसन्न राहील. जेणेकरून तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत.

कसा करावा ओम जप?

सर्वप्रथम तुम्ही सकाळी सूर्योदयापूर्वी उठा. फ्रेश होऊन एखाद्या शांत ठिकाणी जावा. तुम्ही टेरेस किंवा बाल्कनीमध्येही बसू शकता. त्याठिकाणी एक चटई अंथरून बसून घ्या. अशावेळी तुम्ही पद्मासन किंवा सुखासनमध्ये बसू शकता. आता तुम्ही शांत बसून श्वासोच्छ्वास घ्या आणि सोडा. असे ३ वेळा केल्यानंतर ओम जप म्हणायला सुरुवात करा. हा जप तुम्ही १०८ वेळा करू शकता. या मेडिटेशनने तुम्हाला मानसिक समाधान लाभेल. शिवाय एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यात निर्माण होईल.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

Whats_app_banner