मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Menstrual Hygiene Day: पीरियड्समध्ये पॅड्सऐवजी या गोष्टी वापरूनही राखता येते स्वच्छता

Menstrual Hygiene Day: पीरियड्समध्ये पॅड्सऐवजी या गोष्टी वापरूनही राखता येते स्वच्छता

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 28, 2023 02:15 PM IST

Women's Health Tips: महिलांची स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी दरवर्षी २८ मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. स्वच्छता राखण्यासाठी महिला सॅनिटरी पॅडच्या ऐवजी इतर अनेक गोष्टी वापरू शकतात.

मासिक पाळीमध्ये स्वच्छतेसाठी वापरता येणाऱ्या गोष्टी
मासिक पाळीमध्ये स्वच्छतेसाठी वापरता येणाऱ्या गोष्टी (Freepik)

New Age Menstrual Products : महिलांसाठी जिव्हाळ्याच्या परिसराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. विशेषत: मासिक पाळीच्या काळात दुर्लक्ष केल्याने अनेक आजार होतात. मासिक पाळी स्वच्छता दिवस महिलांना संसर्ग आणि रोगांपासून वाचवण्यासाठी साजरा केला जातो. जे महिलांना आरोग्याबाबत जागरुक होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मासिक पाळी दरम्यान फ्लोसाठी अजूनही सामान्य पॅड वापरत असाल तर ही नवीन उत्पादने देखील जाणून घ्या. जे मासिक पाळी थांबवण्यास मदत करेल आणि स्वच्छता देखील राखेल. यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य तर जाणवेलच पण रोगाचा धोकाही कमी होईल.

रियूजेबल पॅड्स

अनेक महिलांना सॅनिटरी पॅड्समुळे पुरळ आणि रॅशेस येतात. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही पुन्हा वापरता येण्याजोगे पॅड म्हणजे रियूजेबल पॅड्स वापरावेत. जो कापूस, बांबूसारख्या अत्यंत मऊ तंतूपासून बनलेला असतो. डॉक्टरही पॅड वापरण्यास नकार देतात. कारण हे पॅड ४-६ तासांपेक्षा जास्त वापरल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो.

टॅम्पन्स

जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये एकदम नॉर्मल लाइफ हवी आहे आणि सॅनिटरी पॅड्समध्ये बंधनासारखे वाटत असेल तर टॅम्पन्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. टॅम्पन्स मुख्यतः स्पोर्ट्स वुमन वापरतात. जेणेकरून त्यांना पॅड्समुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवता येईल. विशेषतः ते सोबत घेऊन जाणे खूप सोपे आहे. टॅम्पॉन हा एक लहान कापूस प्लग आहे, जे मॅन्स्ट्रुअल ब्लड शोषण्यासाठी डिझाइन केलेले आहे. टॅम्पन वजाइनामध्ये इन्सर्ट केला जातो. जेव्हा ते रक्त पूर्णपणे शोषून घेते तेव्हा त्यास चिकटलेल्या पातळ स्ट्रिंगच्या मदतीने ते बाहेर काढले जाते.

मॅन्स्ट्रुअल कप

टॅम्पन प्रमाणेच मॅन्स्ट्रुअल कप देखील योनीमध्ये इन्सर्ट करावा लागतो. हा एक प्रकारचा सिलिकॉन कप आहे. जे योनीच्या आत मॅन्स्ट्रुअल ब्लड होल्ड करून ठेवते. हे ब्लड फ्लोनुसार सुमारे ४-८ तास होल्ड केले जाते आणि नंतर बाहेर काढून धुऊन पुन्हा वापरले जाऊ शकते. मॅन्स्ट्रुअल कप वेगवेगळ्या आकारात येतात. जे शरीराच्या प्रकारानुसार विकत घेतले पाहिजे.

पँटी लाइनर्स

पिरियडच्या शेवटच्या दोन दिवसात जेव्हा फ्लो कमी असतो तेव्हा पँटी लाइनर खूप मदत करतात. ते जड नसतात आणि कपडे खराब होण्यापासून रोखण्यास मदत करतात. टॅम्पन्स किंवा कपसह देखील स्त्रिया कधी कधी पँटी लाइनर वापरतात. जेणेकरून कपड्यांवर डाग येणार नाहीत.

पीरियड्स पॅन्टीज

पीरियड्स पॅन्टीज सामान्य इनरवेअर प्रमाणेच असतात. फक्त त्यांचे फॅब्रिक अतिशय मऊ आणि अनेक लेअर, यूनिक फॅब्रिकने बनलेले आहे. ज्याचा वापर बहुतांशी पीरियडच्या शेवटच्या काळात महिला करतात. ते पुन्हा वापरण्यायोग्य आहेत आणि धुऊन पुन्हा वापरता येतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग