Why Does Blood Change Color During Menstruation: सर्व मुली आणि स्त्रियांना दर महिन्याला मासिक पाळीतून जावे लागते. मासिक पाळी ही बहुतेक स्त्रियांच्या जीवनातील वस्तुस्थिती आहे. पण प्रत्येक स्त्रीची मासिक पाळी वेगळी असते. अनेक मुली आणि स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान गोळे येणे, पाठदुखी, थकवा किंवा अस्वस्थता जाणवते. पण काहींना इतका त्रास सहन करावा लागतो की ते दर महिन्याला कामातून किंवा शाळेतून सुट्टी काढतात. तर काहींना इतका रक्तस्त्राव होतो की ते थकून जातात.बहुतेक स्त्रियांना मासिक पाळी २१ ते ३५ दिवसांच्या दरम्यान किंवा पौगंडावस्थेत ४५ दिवसांपर्यंत असते. रक्तस्त्राव सहसा तीन ते सात दिवसांपर्यंत असतो. स्त्रियांना स्वतःच्या मासिक पाळीबाबत काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. एका स्त्रीसाठी जे सामान्य आहे ते दुसऱ्या स्त्रीसाठी असू शकत नाही.
मासिक पाळीच्या वेळी अनेक वेळा स्त्रियांना रक्ताचा रंग बदलत असल्याचे जाणवते. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशीच्या कालावधीचा रंग वेगळा असतो आणि पाचव्या दिवशी त्याचा रंग बदलतो. मासिक पाळीदरम्यान रक्ताचा रंग तुमच्या शारीरिक आरोग्याची माहिती देत असते. या रंगावरून तुमच्या शरीरात झालेले बदल दिसून येतात. आज आपण या लेखाद्वारे मासिक पाळीच्या वेळी रक्ताच्या कोणत्या रंगाचा अर्थ काय? हे जाणून घेणार आहोत.
मासिक पाळीच्या वेळी गडद लाल रंगाचे रक्त येत असेल तर याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात. जर मासिक पाळी दरम्यान रक्त गडद लाल असेल तर याचा अर्थ ते पूर्णपणे ताजे आहे. अर्थातच तुमची शारीरिक प्रक्रिया सुरळीत आहे.
मासिक पाळीच्या दरम्यान तुमच्या रक्ताचा रंग काळा असेल, तर याचा अर्थ असा होतो की गर्भाशयातून रक्त दीर्घ काळानंतर बाहेर आले आहे. त्यामुळे रक्ताचा रंग काळा आहे. ज्या महिलांमध्ये मासिक पाळी नियमित येत नाही. त्यामुळे गर्भाशयात रक्त जमा होते आणि मासिक पाळीच्या वेळी रक्ताचा रंग काळा होतो.
मासिक पाळीच्या वेळी रक्ताचा रंग गुलाबी असल्यास, ते रक्तातील गर्भाशयाच्या द्रवपदार्थामुळे असू शकते. जर रक्त प्रवाह सामान्य असेल, तर इस्ट्रोजेनच्या पातळीमुळे रक्ताचा रंग गुलाबी होतो. असे तज्ज्ञांचे म्हणने आहे.
मासिक पाळीच्या ७ व्या दिवशी पांढरे रक्त दिसल्यास, ते गर्भाशयाच्या एरिजन क्षरणाची लक्षणे दर्शवते. मासिक पाळीच्या वेळी अशा प्रकारचा रक्तस्त्राव अधिक होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधने आवश्यक असते.
मासिक पाळीच्या वेळी रक्ताचा रंग तपकिरी असेल, तर याचा अर्थ तुमचे रक्त जुने झाले आहे. मासिक पाळीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी अनेक वेळा तपकिरी रंगाचे रक्त येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)