Meaty Diet: पिळदार शरीरासाठी नॉनव्हेज खाण्याची खरंच गरज आहे का? फिटनेस फ्रिक सोनू सूद काय म्हणतो पाहा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Meaty Diet: पिळदार शरीरासाठी नॉनव्हेज खाण्याची खरंच गरज आहे का? फिटनेस फ्रिक सोनू सूद काय म्हणतो पाहा

Meaty Diet: पिळदार शरीरासाठी नॉनव्हेज खाण्याची खरंच गरज आहे का? फिटनेस फ्रिक सोनू सूद काय म्हणतो पाहा

Jul 03, 2024 04:22 PM IST

Sonu Sood Fitness Tips: फिटनेससाठी नॉनव्हेज खाल्ले पाहिजे असा बऱ्याच लोकांचा समज असतो. पण या गैरसमजाबद्दल अभिनेता सोनू सूदने मत व्यक्त केले आहे.

 सोनू सूद
सोनू सूद

Sonu Sood Opinion About Meaty Diet: बॉलीवूड अभिनेता सोनू सूद फक्त त्यांच्या दमदार अभिनय आणि परोपकारी कार्यांसाठीच नाही तर त्याच्या फिटनेससाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. नुकतेच एका मुलाखतीत त्याने त्याच्या फिटनेस रुटीन आणि आहाराबद्दल सांगून चाहत्यांना त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीची झलक दिली आहे. त्याने फिटनेस डायटशी संबंधित काही सामान्य गैरसमजांवरही प्रकाश टाकला आहे. फिटनेससाठी मीट डायट म्हणजेच नॉनव्हेज खाणे किती आवश्यक आहे, ते खरंच गरजेचे आहे का याबाबत सोनू सूद काय म्हणाला ते जाणून घ्या.

मीट डाइट्सबाबत गैरसमज

सोनू सूद म्हणतो, "लोकांना अनेकदा असा गैरसमज असतो की चांगल्या शरीरासाठी तुम्हाला फक्त मांसाहार करणे आवश्यक आहे. पण मी शिकलो आहे की हे सीड स्नॅकिंग किंवा जंक फूडऐवजी डिसिप्लिन डायट म्हणजे शिस्तबद्ध आहारावर टिकून राहण्याबद्दल अधिक आहे." तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही किती आणि कोणत्या प्रमाणात खाता हे अधिक महत्त्वाचे आहे, यावर त्याने भर दिला आहे.

शिस्तबद्ध आणि सक्रिय जीवनशैली हेच गुरुकिल्ली

व्यस्त वेळापत्रक असूनही सोनू सूद कधीही व्यायाम करणे सोडत नाहीत. व्यायामाला ते जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानतात. सोनू सूद दिवसभर सक्रिय राहण्यावर सुद्धा भर देतो. तो म्हणतो, "टीव्ही पाहताना सुद्धा त्या वेळेत मी क्रंचेज, पुश-अप्स आणि सिट-अप्ससह स्वतःला सक्रिय ठेवण्याचे मार्ग शोधतो. या सोप्या अॅक्टिव्हिटीमुळे मला सक्रिय आणि निरोगी राहण्याचे महत्त्व लक्षात येते."

असे आहे वर्कआउट रूटीन

- सोनू सूद दररोज सकाळी जिममध्ये २ तास वर्कआउट करतो. दर आठवड्याला आपल्या व्यायामांमध्ये बदल करतो.

- जिममध्ये २० मिनिटे कार्डिओ व्यायाम करतो. ज्यामुळे त्यांच्या हृदय आणि फुफ्फुसांना मजबूत बनवण्यास मदत होते.

- रोज २० मिनिटे एब्स व्यायाम करतो. ज्यामुळे त्यांच्या पोटाच्या स्नायूंना मजबूत बनवण्यास मदत होते.

- सोनू सूद वेट वाढवण्याऐवजी रिपीटेशन वाढवून लाइट वेट ट्रेनिंग करतो. यामुळे त्यांच्या स्नायूंना टोन आणि मजबूत बनण्यास मदत होते.

- ४० मिनिटे जॉगिंग करतो. ज्यामुळे त्यांच्या सहनशक्ती आणि हृदय आरोग्यास सुधारण्यास मदत होते.

- शूटिंगमुळे जेव्हा ते जिममध्ये जाऊ शकत नाहीत तेव्हा लाँग वॉकसाठी जातात.

- सोनू सूद दर काही महिन्यांनी किकबॉक्सिंगही करतात.

चित्रपट 'फतेह'च्या तयारीत

अभिनेता सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'फतेह'च्या प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. या चित्रपटात ते मुख्य अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम करत आहेत. सायबर गुन्हेगारी आणि भारतातील त्याच्या वाढत्या धोक्याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि जॅकलीन फर्नांडीस यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner