Tribes Ruled By Women In India In Marathi: समाज घडवण्यात महिलांचाही महत्त्वाचा वाटा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिलाही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, असे असतानाही अनेक ठिकाणी महिला चांगल्या जीवनापासून वंचित आहेत. त्यांना बऱ्याचदा कमी लेखले जाते, ज्यामुळे ते प्रगती करू शकत नाहीत आणि समाजाच्या पोकळ रूढी आणि रूढीवादी विचारसरणीत दबले जातात. अशा परिस्थितीत महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी या उद्देशाने विविध प्रयत्न जगभरात केले जातात.
आपल्यापैकी बहुतेकजण पितृसत्ताक समाजाचा भाग आहोत. जिथे एका विशिष्ट लिंगाला महत्त्व दिले जाते आणि समाजात सर्वोच्च स्थानी असल्याचे म्हटले जाते. हा असा समाज आहे जो पुरुषांना अधिक महत्त्व देतो आणि पुरुषांना स्त्रियांवर राज्य करण्याचा अधिकार देतो. पितृसत्ता हा ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ "पित्याचे शासन" असा होतो. ही एक सामाजिक व्यवस्था आहे ज्यामध्ये पुरुषांना प्राथमिक अधिकार आहे आणि स्त्रिया प्रत्येक प्रकारे कोणत्या तरी पुरुषाच्या अधीन आहेत.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की स्त्री-पुरुषांची ही भूमिका बदलली तर काय होईल? असा समाज जिथे मातृसत्ता प्रचलित आहे. ही गोष्ट कल्पनारम्य वाटेल, पण आपल्या देशात असे काही लोक आहेत जे अशा समाजाचे जिवंत उदाहरण मांडतात. हे लोक पितृसत्ताक समाजात राहण्याऐवजी मातृसत्ता निवडतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही समाजांबद्दल सांगणार आहोत, जिथे ते 'मातृसत्ताक' शैलीनुसार आयुष्य जगतात.
भारताचे ईशान्य राज्य मेघालय हे देशातील सर्वात मोठ्या मातृसत्ताक समाजाचे उदाहरण आहे. या समाजात राहणारे लोक प्रामुख्याने त्यांच्या कुटुंबातील आई आणि मुलींचे नाव धारण करतात त्यांना वारसाही मिळतो. याशिवाय, हा समाज मातृस्थानीय संस्कृतीचे पालन करतो, म्हणजे मुले फक्त आईच्या कुटुंबासोबत राहतात. स्त्रीने कितीही वेळा लग्न केले तरी तिची मुले तिच्याकडेच राहतात आणि तिचे नाव घेतात. इतकेच नव्हे तर या समाजात लग्नानंतर महिलांऐवजी पुरुषांना त्यांच्या पत्नीसोबत सासरच्या घरी जाऊन राहावे लागते. तसेच घरातील सर्व कामे पुरुष करतात आणि बाहेरच्या सर्व कामांची जबाबदारी महिला घेतात.
ही भारतातील एक प्रमुख जमात आहे, जी प्रामुख्याने मेघालय राज्यातील गारो पर्वतातील रहिवासी आहे. खासी जातीचे शेजारी असल्यामुळे गारो जमातीची संस्कृतीही त्यांच्यासारखीच आहे. म्हणजेच ती मातृसत्ताक समाज आहे. इथे घराची आई गारो कुटुंबाची प्रमुख असते, पण घराच्या देखभालीची जबाबदारी वडिलांवर असते. इथे मुले फक्त आईचेच नाव घेतात. तसेच पारंपारिकपणे, सर्वात धाकटी मुलगी (नोकामे-चिका) तिच्या आईकडून घराच्या मालमत्तेचा वारसा घेते. इथेही लग्नानंतर पुरुष आपल्या बायकोच्या घरी राहतो.
दक्षिण भारतातही काही जमाती आढळतात, जिथे मातृसत्ता प्रचलित आहे. केरळमधील नायर आणि एझावा हे या समुदायांपैकी एक आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी या जमाती मातृसत्ताक व्यवस्थेखाली राहत होत्या. मातृसत्ताक समाजाच्या अनुषंगाने, येथील लोक कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिला सदस्याच्या अधिपत्याखाली राहतात, ज्याला तरवडा म्हणतात. त्याच वेळी, पती सहसा वेगळ्या खोल्यांमध्ये किंवा पूर्णपणे वेगळ्या घरात राहतात आणि त्यांच्या मुलांबद्दल कोणतीही जबाबदारी नसते. या समाजाच्या सर्व पिढ्या मातृसत्ताकाच्या कौटुंबिक नावाचा वारसा घेतात आणि तिची मालमत्ता ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता मानतात. याबासोबतच तुलूवा समाज आणि बोन्डा समाजाचादेखील यामध्ये समावेश होतो.
संबंधित बातम्या