मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care Tips: ‘या’ तेलाने चेहऱ्याला करा मसाज, दिसू लागाल तरुण! त्वचा चमकदारही होईल

Skin Care Tips: ‘या’ तेलाने चेहऱ्याला करा मसाज, दिसू लागाल तरुण! त्वचा चमकदारही होईल

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 15, 2023 02:32 PM IST

Oil Massage of Face: जर तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव असेल तर तुम्ही या तेलाने चेहऱ्याची मालिश करावी, लवकरच फरक दिसेल.

स्किन केअर
स्किन केअर (Freepik)

Face Massage: जर चेहऱ्यावर वेळेपूर्वी सुरकुत्या दिसू लागल्या किंवा डोळ्यांखाली बारीक रेषा आणि काळी वर्तुळे दिसू लागली तर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी तसेच खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेला वेळेपूर्वी वृद्ध (Ageing sign) होण्यापासून प्रतिबंधित करता येईल. आज या लेखात आपण अशा तेलाने चेहऱ्याच्या मसाजबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वचा तरूण दिसेल, चला तर मग जाणून घेऊया.

कोणत्या तेलाने चेहरा मसाज करावा?

> जर तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव असेल तर तुम्ही खोबरेल तेलाने चेहऱ्याची मालिश करू शकता. ते तुमच्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते आणि घट्टपणा दूर करते.

> याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग नाहीसे होतात. या संदर्भात देखील हे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेलात चिमूटभर हळद मिसळूनही चेहऱ्याला मसाज करू शकता. त्वचा घट्ट ठेवण्यासाठी आणि डाग दूर करण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे.

> तुम्ही रोज रात्री खोबरेल तेलाने मसाज करू शकता. यामुळे सकाळी तुमची त्वचा तजेलदार राहील. पण जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तेलाचे प्रमाण कमी ठेवा. अन्यथा, याचा विपरीत परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होईल. दुसरीकडे, ज्या लोकांना खोबरेल तेलाची ऍलर्जी आहे त्यांनी ते अजिबात वापरू नये.

> खोबरेल तेलातील पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर त्यात सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. याशिवाय यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के सारखे गुणधर्म असतात, जे दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग