मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Best Non Alcoholic Drinks: मसाला चहा बनला जगातील दुसरे सर्वोत्तम पेय, जाणून घ्या त्याचे फायदे!

Best Non Alcoholic Drinks: मसाला चहा बनला जगातील दुसरे सर्वोत्तम पेय, जाणून घ्या त्याचे फायदे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 20, 2024 10:36 PM IST

Masala Chai: चहा न आवडणारा क्वचितच कोणी असेल. हे भारतातील एक आवडते पेय आहे जे कोणत्याही सिजनमध्ये उत्साहाने प्यायले जाते. यामुळेच नुकत्याच जाहीर झालेल्या जगातील टॉप नॉन-अल्कोहोल ड्रिंक्सच्या यादीत मसाला चहाने दुसरे स्थान पटकावले आहे.

 Masala Chai is 2nd Best non alcoholic drinks
Masala Chai is 2nd Best non alcoholic drinks (Freepik)

Health Benefits of Masala Chaha: अनेक भारतीयांच्या घरात सकाळी चहा हमखास बनतो. अनेकजण तर दिवसातून अनेकदा चहा पितात. हिवाळ्यात तर चहा हवाहवासा वाटतो. हिवाळ्यात चहा पिल्याने सर्व थकवा आणि आळस दूर होतो. प्रत्येक सिजनमध्ये चहा मोठ्या उत्साहाने प्यायले जातो. चहाच्या या क्रेझमुळे अनेक प्रकारचे वेगवेगळे चहाची रेसिपी तयार झाली. यापैकी एक म्हणजे, मसाला चहा. हा मसाला चहा जवळजवळ प्रत्येक भारतीयाचा आवडता आहे. क्वचितच कोणी असेल ज्याने मसाला चहा चाखला नसेल. परदेशातही हा चहा आता प्रसिद्ध होऊ लागला आहे. खरं तर, भारताचा मसाला चहा नुकताच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट नॉन-अल्कोहोल पेय म्हणून निवडला गेला आहे. ही बातमी आपल्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची आहे, कारण इथे चहा हे फक्त पेय नसून एक भावना आहे. चहा हे भारतीय घरातील मुख्य पेय आहे. ऋतू किंवा वेळ कोणताही असो, क्वचितच कोणी एक कप चहा नाकारू शकेल.

मसाला चहा बनला जगातील दुसरे सर्वोत्तम पेय

टेस्ट अ‍ॅटलसने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील टॉप नॉन-अल्कोहोल ड्रिंक्सच्या यादीत मसाला चहाने दुसरे स्थान पटकावले आहे. टेस्ट अ‍ॅटल हे एक लोकप्रिय ऑनलाइन फूड पोर्टल आहे. या पोर्टलवर जगभरातील खाद्यपदार्थांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातात. साध्य प्रिसद्ध केलेल्या नॉन-अल्कोहोल ड्रिंक्सच्या यादीत मसाला चहा दुसऱ्या स्थानावर आला आहे. तर पहिला क्रमांक मेक्सिकोच्या अगुआस फ्रेस्कसला मिळाले आहे. हे एक प्रकारचे पेय आहे जे फळे, काकडी, फुले, बिया आणि धान्ये साखर आणि पाण्यात मिसळून तयार केले जाते.

Masala Chaha Recipe: घरी परफेक्ट मसाला चहा बनवू शकत नाही? बघा रेसिपीचा Video

मसाला चहा पिण्याचे फायदे

> लवंग आणि आले चहामध्ये वापरल्याने दाताच्या वेदना कमी होते.

> यामध्ये असलेले आले पचनाच्या समस्या दूर करून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

> मसाला चहा हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो.

> व्हिटॅमिन सी समृद्ध, वेलची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास योगदान देते, ज्यामुळे आपण रोग आणि संक्रमणांशी लढण्यास सक्षम बनते.

> चहाच्या मसाल्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रोगजनकांशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel