मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Chaas Recipe: उन्हाळ्यात थंडगार 'मसाला ताक' प्यायचे? मग ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा

Masala Chaas Recipe: उन्हाळ्यात थंडगार 'मसाला ताक' प्यायचे? मग ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 30, 2024 09:59 AM IST

Spiced Buttermilk: ताक हे शरीरासाठी थंड असते. त्यामुळे उन्हाळा सुरु झाला की अनेकांना घरच्या घरी ताक बनवायचे असते. चला जाणून घेऊया मसालेदार ताक बनवण्याची सोपी रेसिपी...

उन्हाळ्यात थंडगार 'मसाला ताक' प्यायचे? मग ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
उन्हाळ्यात थंडगार 'मसाला ताक' प्यायचे? मग ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा

Masala Chaas Recipe in Marathi: उन्हाळा सुरु झाला की शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अनेकजण घरच्या घरी अनेक पदार्थ बनवून खाण्यास सुरुवात करतात. हे चवदार पदार्थ शरीराला थंडावा देण्यास आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे काम हे ताक करते. ताक प्यायल्याने शरीराचे तापमान टिकून राहण्यास मदत होते. तसेच पचनशक्ती सुद्धा सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. पण अनेकांना साधे ताक प्यायला आवडत नाही. मग मसाले ताक हा पर्याय असतो.

अनेकजण बाहेरुन विकत आणलेले ताक आणि मसाला ताक पितात. पण काही गृहीणी मात्र हे ताक घरच्या घरी बनवून कुटुंबीयांना प्यायला देतात. तुम्हाला पण मसाला ताक घरच्या घरी बनवायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा...
वाचा: लाटणं न वापरता टम्म फुगणारी पुरी बनवली आहे का? पाहा देशी जुगाड

मसाला ताक बनवण्याचे साहित्य

२ कप दही

१ चमचा जिरे पावडर

२ हिरव्या मिरच्या

१/४ कोथिंबीर

१/४ पुदिन्याची पाने

२ पाकळ्या लसूण

१/४ चमचा काळे मिठ

चवीनुसार मीठ

मसाला ताक बनवण्याची पद्धत

मसाला ताक बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिन्याची पाने आणि कोथिंबीरची पाने तोडून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि एक चमचा दही हे मिक्सरमधून काढून घ्या. तयार झालेली हिरवी पूड एका भांड्यात काढून घ्या.
वाचा: एप्रिलमध्ये करा मध्य प्रदेश एक्सप्लोर करण्याचा प्लॅन, बघा IRCTCचं पॅकेज!

आता दही, जिरेपूड, काळे मिठ हे मिक्सरमध्ये फिरवा. चवीनुसार मिठ आणि गरजेनुसार पाणी घालून पुन्हा मिक्समध्ये फिरवा. तयार झालेल्या मिश्रणात हिरवी पूड घाला आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवा. त्यानंतर हवे असल्यास त्यात आणखी पाणी घाला आणि रवीच्या मदतीने पुन्हा थोडे घुसळा. तयार झालेले फेसाळलेले ताक एका ग्लासात काढून घ्या. हवे असल्याच त्यामध्ये एक ते दोन बर्फाचे तुकडे घाला. तुमचे मसाला ताक तयार झाले आहे.

वाचा: केवळ मधुमेहच नाही तर वेट लॉससाठी फायदेशीर आहे रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाणे, हे आहेत फायदे

ताक पिण्याचे फायदे

ताक हे शरीराला थंडावा देण्यास आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. तसेच शरीराचे तापमान टिकून ठेवण्यासाठी ताक प्यायले जाते. ताकाच्या सेवनाने पचनशक्ती सुद्धा सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

WhatsApp channel