Marriage Tips: उशिरा लग्न करण्याचे आहेत अनेक फायदे, वाचून बसणार नाही विश्वास-marriage tips what exactly are the benefits of late marriage ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marriage Tips: उशिरा लग्न करण्याचे आहेत अनेक फायदे, वाचून बसणार नाही विश्वास

Marriage Tips: उशिरा लग्न करण्याचे आहेत अनेक फायदे, वाचून बसणार नाही विश्वास

Sep 05, 2024 01:15 PM IST

What is the right age to get married: पूर्वीच्या काळात, लोकांचा असा विश्वास होता की, लवकर लग्न जोडप्यांमधील परस्पर समंजसपणा वाढवते आणि नातेसंबंधात परिपक्वता आणते.पण आता बदलत्या विचारसरणीच्या तरुणांचा यावर विश्वास नाही.

Benefits of getting married in your 30s
Benefits of getting married in your 30s (shutterstock)

Getting married at 30 gives you these benefits: आजही भारतात लग्नाचे कायदेशीर वय मुलांसाठी २१ वर्षे आणि मुलींसाठी १८ वर्षे ठेवले आहे. तरी बदलत्या काळाने तरुणांच्या विचारसरणीत खूप बदल घडवून आणला आहे. आता बहुतेक तरुणांना वयाच्या १८ आणि २१ व्या वर्षी नव्हे तर वयाच्या ३० व्या वर्षीच लग्न करायचे आहे. तथापि, पूर्वीच्या काळात, लोकांचा असा विश्वास होता की, लवकर लग्न जोडप्यांमधील परस्पर समंजसपणा वाढवते आणि नातेसंबंधात परिपक्वता आणते.पण आता बदलत्या विचारसरणीच्या तरुणांचा यावर विश्वास नाही. वयाच्या ३० व्या वर्षी लग्न करणं योग्य मानणाऱ्या तरुणांच्या यादीत तुमचाही समावेश असेल, तर असे करणाऱ्या जोडप्यांना काय फायदा होतो ते जाणून घेऊया.

३० व्या वर्षी लग्न केल्याने तुम्हाला हे फायदे मिळतात-

आर्थिक परिस्थिती मजबूत होईल-

जर तुम्ही वयाच्या २३-२४ वर्षापर्यंत लग्न केले, तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर नसाल आणि जीवनात यश आणि स्थिरता मिळविण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे, तुमच्या कुटुंबासाठी सुखसोयी आणि सुविधा पुरवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ आणि मेहनत लागू शकते. तर वयाच्या ३० व्या वर्षी जवळजवळ प्रत्येकजण त्यांच्या करिअरमध्ये स्थिर होतो. करिअरमध्ये स्थिरता आल्यावरच आर्थिक स्थिती मजबूत होते. जी यशस्वी वैवाहिक जीवनासाठी खूप महत्त्वाची असते.

मानसिकदृष्ट्या परिपक्व व्हाल-

वाढत्या वयाबरोबर माणसाची विचारसरणीही खूप बदलते. २० वर्षांच्या व्यक्तीच्या तुलनेत ३० वर्षांची व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक प्रौढ बनते. अशा व्यक्तीला आपल्या जोडीदाराच्या सर्व गरजा चांगल्या प्रकारे समजतात. ज्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होते. त्यामुळे त्यांच्यात मतभेद कमी प्रमाणात होतात.

लवकर मुलं होण्यासाठी दबाव नाही-

बहुतेक प्रकरणांमध्ये, तुम्ही जितक्या लवकर लग्न कराल तितकेच जोडप्यांना मुले होण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडून जास्त दबाव येतो. पण वयाच्या ३० व्या वर्षी आणि लग्न झाल्यावर तुम्ही तुमचे सर्व निर्णय स्वतः घेण्यास सुरुवात करता. त्यामुळे लवकर मुलं होण्याचं दडपण तुम्हाला वाटत नाही.

पैशाचा योग्य वापर-

२३-२४ वर्षांच्या तरुणाला पहिली नोकरी मिळताच त्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला पगार खर्च करायचा असतो. पण वयाच्या ३०व्या वर्षी पोहोचल्यानंतर माणसाला पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे कळते, त्यामुळे तो अनावश्यक खर्च करण्यापासून दूर राहतो. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यास ते समर्थ असतात.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)