Marriage Tips: लग्न करण्यापूर्वी जोडीदाराला कोणते प्रश्न विचारावे माहितेय? संसार होईल सुखाचा, येणार नाहीत अडचणी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marriage Tips: लग्न करण्यापूर्वी जोडीदाराला कोणते प्रश्न विचारावे माहितेय? संसार होईल सुखाचा, येणार नाहीत अडचणी

Marriage Tips: लग्न करण्यापूर्वी जोडीदाराला कोणते प्रश्न विचारावे माहितेय? संसार होईल सुखाचा, येणार नाहीत अडचणी

Dec 08, 2024 12:59 PM IST

Marriage Tips In Marathi: बऱ्याचवेळा लग्न झाल्यानंतर अनेक गोष्टी समजतात, ज्या एकेमकांना पटत नाहीत. किंवा एखाद्या बाबतीत दोघांचे विचार वेगवगेळे असतात. त्यामुळे लग्नानंतर नात्यात अडचणी येऊ लागतात. त्यामुळेच तज्ज्ञ लनापूर्वीच काही गोष्टींची काळजी घ्यायला सांगतात.

What Questions To Ask Your Partner Before Marriage In Marathi
What Questions To Ask Your Partner Before Marriage In Marathi (freepik)

Questions To Ask Before Marriage In Marathi:  अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. बऱ्याचवेळा लग्न झाल्यानंतर अनेक गोष्टी समजतात, ज्या एकेमकांना पटत नाहीत. किंवा एखाद्या बाबतीत दोघांचे विचार वेगवगेळे असतात. त्यामुळे लग्नानंतर नात्यात अडचणी येऊ लागतात. त्यामुळेच तज्ज्ञ लनापूर्वीच काही गोष्टींची काळजी घ्यायला सांगतात. ज्यामुळे लग्नानंतर पती-पत्नींमध्ये मतभेद होणार नाहीत आणि नाते तुटण्याची शक्यता अतिशय कमी होईल. यामध्ये लग्नापूर्वीच मुलामुलीने एकमेकांना काही प्रश्न विचारून एकेमकांचे विचार जाणून घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

याबाबत बोलताना मानसशास्त्रज्ञ आणि मानसिक आरोग्य पॉडकास्ट होस्ट अँड्रे बॅनियॉर म्हणतात की, गेल्या काही वर्षांमध्ये, मी दुःखी वैवाहिक जीवनात अनेक व्यक्ती पाहिल्या आहेत. यापैकी काही प्रकरणांमध्ये, काही विशिष्ट संकटे आहेत ज्यामुळे तणाव निर्माण झाला आहे: एखाद्या प्रिय व्यक्तीचे नुकसान, मुलांचे संगोपन करण्यात अडचणी, अनपेक्षित आरोग्य समस्या किंवा आर्थिक अडचणी. परंतु इतर प्रकरणांमध्ये, संभाव्य भांडणाचे प्रारंभिक कारण व्यक्तिमत्वमधील फरक आणि दैनंदिन विसंगती हे आहे. त्यामुळे त्यांनी लग्नापूर्वी जोडीदाराला काही प्रश्न विचारण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊया ते प्रश्न नेमके कोणते आहेत...

१) आत्ताच्या कोणत्या सवयी आवडतात पण नंतर त्या खटकू शकतात?

बऱ्याचदा जोडीदाराच्या वेगळ्या सवयी आपल्याला आकर्षित करतात. हा विरोधाभास आपल्याला आवडतो. परंतु काही काळानंतर त्या गोष्टी आपल्याला खटकू शकतात. आणि त्या बदलण्यासाठी वादविवाद होऊ शकतात. स्वभावातील हे फरक समजून घेऊन त्यानुसार स्वतःला तयार करा.

२)आपण ताणतणाव कसे हाताळतो-

अनेकदा ताणतणावत आपल्याला विशेष काही करण्याची सवय असते. किंवा तणावात आपसूकच आपल्याकडून काही गोष्टी घडत असतात. आपण ताणतणावला कसे सामोरे जातो हे जोडीदाराला आधीच माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे नात्यात गैरसमज होणार नाहीत. आणि तणावाच्या काळात एकमेकांना त्या-त्या गरजेनुसार साहाय्य करणे सोपे जाईल.

३)जोडीदाराला कोणते व्यसन आहे का?

खासकरून अनेक पुरुषांना व्यसन असते. त्यामुळे बऱ्याचदा लग्नानंतर व्यसनामुळे नातेसंबंध खराब होतात. परंतु तुमच्या जोडीदाराला आधीच याची कल्पना असेल तर ते स्वतःला त्यानुसार तयार करतात. किंवा हे व्यसन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता.

४) लग्नानंतर पालक होण्याबाबत विचार-

अनेक लोक लग्नानंतर लगेच आई वडील होऊ इच्छितात, तर काही लोकांना थोडासा वेळ हवा असतो. त्यांना लगेच इतकी मोठी जबाबदारी नको असते. अशावेळी जर तुमचे मत तुमच्या जोडीदारापेक्षा वेगळे असेल तर तुमच्यात वादविवाद होऊ शकतात. शिवाय तुमचे नाते तुटू शकते. त्यामुळे आधीच या गोष्टीबाबत माहिती असणे गरजचे आहे.

५) एकमेकांमध्ये हवे असलेले बदल-

बऱ्याचवेळा लग्नानंतर आपल्याला जोडीदाराच्या काही गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे नातेसंबंधात सतत खटके उडतात. परंतु तुम्ही लग्नापूर्वीच एकमेकांबद्दल अपेक्षा सांगितल्या तर बदल घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

६) एकमेकांचे शारीरिक प्रॉब्लेम्स-

अनेक नातेसंबंधांमध्ये लग्नानंतर जोडीदाराच्या शारीरिक प्रॉब्लेम्सबद्दल एकमेकांना समजते. त्यामुळे काही प्रमाणात धक्का बसू शकतो. शिवाय फसवल्याची भावना होऊ शकते. त्यामुळे एकमेकांना आपले प्रॉब्लेम्स आधीच बोलून त्यावर योग्य ते उपाय करणे गरजेचे आहे.

Whats_app_banner