महाराष्ट्र संस्कृतीमध्ये उखाणा हा महत्त्वाचा भाग आहे. एका वेगळ्या लयबद्ध आणि विशिष्ट पद्धतीने आपल्या जोडीदाराचे नाव घेणे याला उखाणा म्हणतात. महाराष्ट्रात लग्नाच्या प्रत्येक विधीनंतर उखाणा घेण्याचा रिवाज आहे. त्यामुळे नवी नवरी ही मजेशीर पद्धतीने उखाणे घेताने दिसते. मग ते लग्नकार्य झाल्यानंतर असो वा पूजा, गोंधळ झाल्यानंतर असो उखाणे घेणे हा वधू आणि वर दोघांसाठी जवळपास अनिवार्यच असते. पण उखाणा नेमका कोणता घ्यायचा असा प्रश्न वधूला अनेकदा पडतो. चला पाहूया वधूंसाठी काही खास उखाणे...
सासरचा गाव चांगला, गावामध्ये बंगला
बंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोण
द्रोणात तुप, तुपा सारखे रूप
रूपा सारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढा
चंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावं
आणि … रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर, फिरवावं
वाचा: नारळाच्या तेलात तुरटी मिसळून वापरण्याचे ३ मोठे फायदे! तुम्हाला माहित आहेत का?
येत होते जात होते, खिडकीवाटे पाहत होते,
खिडकी लागली कानाला, खिडकीला तीन तारा,
अडकीले घुंघर बारा, पान खाते कराकरा,
घाम येतो दरदरा, तिकडून आला व्यापारी,
व्यापारीनं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला,
हंडा घेते पाण्याला, पाणी आणते गंगेचे,
वाडा बांधते भिंगाचं, वाड्यात वाडे सात वाडे,
एका वाड्यात पलंग, पलंगावर गादी,
गादीवर उशी, उशीवर होती कप-बशी,
कपबशी दिली पाहुण्याला, त्यांनी पाहिलं समोरच्या भिंतीला,
भींतीवर होती घड्याळ, घड्याळात वाजले एक,
… रावांचे नाव घेते, … ची लेकं.
वाचा: ‘या’ ५ चुका तुमच्या केसांना बनवू शकतात मुळापासून निर्जीव! तुम्हीही करत नाही ना? वाचा...
गावात घर, घरासमोर अंगण,
अंगणात मोठे प्रांगण, प्रांगणात तुळशीचे वृंदावन,
वृंदावना समोर रांगोळी, नाव घेते हळदीच्या वेळी,
नाव घ्या, नाव घ्या, नावात काय असत,
नावात असत, लहानांच मोठेपण,
मोठ्यांचा थोरपण, थोरांचा मान,
तोच आमचा स्वाभिमान, … रावांच नाव घेऊन ठेवते सर्वांचा मान.
वाचा: व्हिसा न घेताही ‘या’ देशांमध्ये बिनधास्त फिरू शकतात भारतीय! पाहा कोणते आहेत हे देश...
नाव घेते नाव,
सासर हेच आता माझं गाव, गावात बांधाला बंगला,
बंगल्याला लावला चुना, चुण्यावर नेसली साडी,
साडीला लावला चाप, … माझे बाप,
दारात होती जाई, … माझी आई,
ताटात होता खाऊ, …. माझा भाऊ,
कपाटात ठेवली चैन, ….माझी बहीण,
पाण्याला चालली गवळण, … माझी मावळण,हातात होती अंगठी,
त्यावर चंद्राची खून, … रावांचे नाव घेते, …. रावांची सून.
कणकण कुदळी, मन-मन माती,
पोचारल्या भीती, चेतरले काम,
सासूबाईच्या पोटी जन्मले राम, राम गेले हटा,
हटावून आणल्या करडी, त्याच्या घेतल्या आरडी,
उरल्या सुरल्या शिक्यावर ठेवल्या,
शिक तुटलं, भांडं फुटलं,
वगळ गेला परस दारी,
परसदार म्हणतं नाव घे पोरी,
नाव काय फुकटचं, नाव हळदी कुंकवाचं,
हळदी कुंकवाने भरले ताट, …राव बसले जेवायला
तर समया लावते तीनशे साठ.
अंतरवाळी पंतरवाळी, पंतरवळीवर वाढला भात,
भातावर टाकलं तूप, तूपा सारख माझा गोरं गोरं रूप,
रूपासारखा बांधला मोठा वाडा, वाड्यात आणला घोडा,
घोड्याने खाल्ली सुपारी, आणि …. चा बाप म्हणजे देवळाबाहेरचा भिकारी
लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
…. रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???
उंच मनोरे, नव्या जगाचे,
…. रावांमुळे भेटले मला, हे दिवस सुखाचे.
शब्दही न बोलता, साद घातली कुणी,
…. राव आहेत, माझ्या दिलाचे धनी.
समोर येताच तुमचा चेहरा, बघून काळजाचा चुकतो ठोका,
…. रावांचे सर्वांसमोर नाव घेण्याचा, भेटला आज मोका.
संबंधित बातम्या