मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marathi Bhasha Gaurav Din 2024: मराठी भाषा गौरव दिनाच्या द्या मराठीतून खास शुभेच्छा, प्रियजनांना पाठवा हे मॅसेज

Marathi Bhasha Gaurav Din 2024: मराठी भाषा गौरव दिनाच्या द्या मराठीतून खास शुभेच्छा, प्रियजनांना पाठवा हे मॅसेज

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 27, 2024 09:59 AM IST

Marathi Bhasha Gaurav Din Wishes: दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त तुम्ही हा खास मराठी मॅसेज सर्वांना पाठवू शकता.

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा

Marathi Bhasha Gaurav Din Wishes, Quotes and Messages: आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. ज्ञानपीठ विजेचे प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून नमूद करण्यात आला आहे. कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राची बोलीभाषा मराठीला साहित्यात विशेष स्थान निर्माण करून दिले. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी सुद्धा त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मराठी भाषेतील या कार्याची दखल घेऊन त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त तुम्ही सुद्धा आपले मित्र, नातेवाईक यांना खास मराठीतून शुभेच्छा देऊन मराठीचा गौरव करू शकता. येथे पाहा काही खास शुभेच्छा संदेश.

 

लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी

धर्म, पंथ जात एक, जाणतो मराठी

एवढ्या जगात माय, मानतो मराठी

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

माय मराठी, साद मराठी

भाषांचा भावार्थ मराठी,

बात मराठी, साथ मराठी

जगण्याला या अर्थ मराठी

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

रुजवू मराठी

फुलवू मराठी

चला बोलू

फक्त मराठी

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शान

भजन, कीर्तन, भारुड ऐकून हरपून जाते भान

काना, मात्रा, वेलांटीचे मिळाले आहे वाण,

साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान,

अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व

मराठी भाषा गौरव दिन आनंदाने साजरे करू सर्व...

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त

करू मराठी भाषेचा सन्मान

राखू मराठीचा अभिमान आणि

करु मराठीचा जयजयकार

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

मराठी भाषा, मराठी मन

अभिमान महाराष्ट्राचा,

स्वाभिमान मराठीचा...

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या

दऱ्याखोऱ्यातील शिळा

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

मराठी म्हणजे गोडवा,

मराठी म्हणजे प्रेम,

मराठी म्हणजे संस्कार,

मराठी म्हणजे आपुलकी,

मराठी म्हणजे महाराष्ट्र

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

WhatsApp channel

विभाग