मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Type 2 Diabetes म्हणजे काय? वेळीच काय काळजी घ्यावी?

Type 2 Diabetes म्हणजे काय? वेळीच काय काळजी घ्यावी?

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Mar 08, 2024 06:00 PM IST

मधुमेह (Diabetes) च्या आजारामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रभावित केले आहे. सामान्यत: शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार न होणे किंवा इन्सुलिनचा योग्य वापर करण्याची शरीराची असमर्थता यामुळे हा आजार उदभवतो. टाइप टू डायबिटीजचे (Type 2 Diabetes) नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी काय करावे, याची माहिती.

Type 2 Diabetes साठी कोणती काळजी घ्यावी?
Type 2 Diabetes साठी कोणती काळजी घ्यावी?

टाइप 2 प्रकारच्या मधुमेहाने (Type 2 Diabetes) जगभरात कोट्यवधी लोकांना प्रभावित केले आहे. एखाद्या व्यक्तिचे शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करण्यास असमर्थ असते तेव्हा टाइप 2 प्रकारचा मधुमेह होतो. या प्रकारच्या मधुमेहामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. डायबिटीजची समस्या वाढल्यास हृदयाची समस्या किंवा शरीराचा एखाद्या अवयव विच्छेदन करण्याची वेळ येऊ शकते. या आजारामुळे शरीरात होणारी दीर्घकालीन गुंतागुंत टाळण्यासाठी मधुमेहाचे नीट व्यवस्थापन करणे आवश्यक असते. पोर्तुगालमधील संशोधकांनी टाइप 2 डायबिटीजच्या रुग्णांच्या शरीराचे मूल्यांकन केले आहे. इन्सुलिन घेत असलेले रुग्ण आणि इन्सुलिन न घेणाऱ्या रुग्णांचा या सर्वेमध्ये समावेश होता. या आधारावर संशोधकांनी काही निष्कर्ष जाहीर केले आहेत. टाइप 2 मधुमेह असलेल्या बऱ्याच लोकांना त्यांना हा आजार झाला असल्याची माहितीच नसते, असं संशोधकांना आढळून आले आहे.

डायबिटीजबद्दल माहिती असल्यास करता येते नीट व्यवस्थापन

रोग्यांना मधुमेहाचे कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी संशोधकांनी टाइप 1 किंवा टाइप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी एक चाचणी डिझाइन केली होती. डायबिटीजची चाचणी आणि इतर गोष्टींव्यतिरिक्त संशोधकांनी रुग्णांना त्यांचा आहार, लक्षणे आणि औषधोपचाराबद्दल प्रश्न विचारले होते. या संशोधनात १२०० मधुमेहींचा समावेश होता. त्यापैकी ४० टक्क्यांहून अधिक मधुमेही हे इन्सुलिन घेत होते. उर्वरित रुग्ण डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट आहार घेत होते.

यातील ७१.३ टक्के रुग्णांना डायबिटीजच्या नियंत्रणात आहाराच्या महत्वाच्या भूमिकेविषयी माहिती होती, असं संशोधनात आढळून आलं आहे. पाचपैकी चार जणांना शारीरिक हालचालींच्या फायद्याविषयी उत्तम ज्ञान होते. यातील ७५ टक्क्याहून अधिक जणांना रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी सर्वोत्तम पद्धतीबद्दल माहिती होती, असं आढळून आलं आहे.

तथापि, इतर बाबतीत मात्र डायबिटीजच्या रुग्णांना फार माहिती नव्हती, असं संशोधनात आढळून आलं आहे. उदाहरणार्थ, रक्तात साखरेची पातळी कमी असल्यास कोणते खाद्यपदार्थ वापरू नये असे विचारले असता केवळ १२.८ रुग्णांना याचे योग्य उत्तर देता आले. तर फक्त ४.४ टक्के रुग्णांना अचूक उत्तर देता आले.

औषधांच्या वापराने टाइप 2 डायबिटीजवर नियंत्रण मिळवता येत असले तरी रुग्णांना या आजाराबद्दल, आहाराबद्दल सुयोग्य माहिती देणे फार आवश्यक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांनी या आजाराबद्दल अधिक माहिती घेण्यासोबतच विशिष्ट आहाराचे पालन केल्यास डायबिटीजच्या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असं संशोधकांचे म्हणणे आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या