मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Biryani Recipe: पावसाळ्यात घरच्या घरी बिर्याणी बनवायची आहे? मग ‘या’पैकी नक्की बनवा

Biryani Recipe: पावसाळ्यात घरच्या घरी बिर्याणी बनवायची आहे? मग ‘या’पैकी नक्की बनवा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 15, 2024 05:48 PM IST

Biryani Recipe: पाऊस सुरु झाल्यावर वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा सर्वांना होत असते. त्यामुळे बिर्याणी जर बनवायची असेल तर ही बातमी नक्की वाचा...

Biryani recipe: पावसाळ्यात बिर्याणी बनवयाची असेल तर नक्की वाचा
Biryani recipe: पावसाळ्यात बिर्याणी बनवयाची असेल तर नक्की वाचा

पावसाळा सुरु झाला की सगळीकडे थंडगार वातावरण असते. पाऊस पडत असल्यामुळे हवेत गारवा असतो. गरमगरम पदार्थ खाण्याची सर्वांचीच इच्छा होत असते. अशा वेळी काय खावे असा प्रश्न देखील पडत असतो. अनेकजण जेवणात बिर्याणी खाण्याची इच्छा व्यक्त करतात. मग ती शाकाहारी असो वा मांसाहारी असो. बिर्याणी ही सर्वांना आवडते. पण बिर्याणी कशी बनवायची हे जाणून घ्या...

पनीर मखनी बिर्याणी

शाकराहारी खाणाऱ्यांसाठी पनीर मखनी बिर्याणी हा पर्याय योग्य ठरु शकतो. या बिर्याणीमध्ये सुका मेवा वापरला जातो. तसेच केसर आणि गुलाबाच्या पाकळ्याही या बिर्याणीमध्ये वापरल्या जातात. पनीर माखनी बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ आणि पनीर मसाल्यांचा वापर करून शिजवले जातात. त्यामुळे चव वाढते. ही बिर्याणी बनवणे योग्य पर्याय ठरु शकतो.
वाचा: कैरीचं लोणचं खाण्यासाठी पाहावी लागणार नाही जास्त वाट, या रेसिपीने इंस्टंट बनवा

लखनऊ बिर्याणी

पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी खाणे सर्वांना आवडतात. त्यामध्ये लखनवी बिर्याणीचा देखील समावेश आहे. ही बिर्याणी उत्तर भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. ही बिर्याणी बडीशेप, केसर आणि दालचिनी सारख्या मसल्यापासून बनवली जाते. त्यामुळे तुम्ही ही बिर्याणी पावसाळ्यात बनवणे योग्य पर्याय ठरु शकतो.
वाचा: गर्दीपासून लांब कुठे तरी शांत ठिकाणी जायचे? मग ठाण्याजवळील ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

ट्रेंडिंग न्यूज

चिकन बिर्याणी

दक्षिण भारतात खास करुन केरळ राज्यात चिकण बिर्याणी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. तेथील ही बिर्याणी अतिशय लोकप्रिय आहे. या बिर्याणीमध्ये तांदूळ आणि मॅरिनेट केलेल्या चिकनचा वापर केला जातो. जवळपास ४ तास मसाले घालून हे चिकन मॅरिनेट केले जाते. त्यानंतर ते बिर्याणीमध्ये भातासोबत शिजवले जाते. त्यामुळे भाताची चव आणखी वाढते. ही बिर्याणी सर्वांना आवडते.
वाचा: डेंग्यू झाल्यामुळे प्लेटलेटची संख्या कमी झाली आहे? मग 'हे' पदार्थ नक्की खा

फिश बिर्यांणी

अनेकदा कोळंबी भात सर्वांना आवडतो. या बिर्याणीमध्ये कोळंबी पहिले मसाल्यांमध्ये शिजवनू घेतली जाते. त्यानंतर ती ग्रेवी भातामध्ये टाकली जाते. भात शिजताना पुन्हा ही कोळंबी शिजते. त्यामुळे भाताला आणखी चव येते. ही बिर्याणी पावसाळ्यात खाणे योग्य पर्याय ठरु शकतो.

पावसाळ्यात तुम्हाला देखील बिर्याणी खाण्याची इच्छा झाली तर नक्की वरील दिलेल्या बिर्याणी पैकी एक बनवा.

WhatsApp channel
विभाग