मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

May 18, 2024 11:24 AM IST

Mango Lassi Recipe: उन्हाळ्यात आंबा आणि दह्यापासून बनवलेली आंब्याची लस्सी अर्थात ‘मँगो लस्सी’ आतड्यांचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी तसेच, संपूर्ण शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!
उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

Mango Lassi Recipe: उन्हाळी हंगाम म्हणजे आंब्याचा मोसम. आंबा प्रत्येकालाच त्याच्या सुगंधाने आणि चवीने वेड लावतो. आंबा आवडत नाही अशी व्यक्ती क्वचितच आढळेल. उन्हाळ्याच्या या सीझनमध्ये आंबा भरभरून येतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, आपण आपल्या जेवणात अनेक प्रकारात आंब्याचा वापर करू शकतो. आंब्याच्या पन्ह्यापासून ते आंब्याच्या लस्सीपर्यंत सर्वच पदार्थ चवीसोबतच आरोग्यानेही परिपूर्ण आहेत. उन्हाळ्यात आंबा आणि दह्यापासून बनवलेली आंब्याची लस्सी अर्थात ‘मँगो लस्सी’ आतड्यांचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी तसेच, संपूर्ण शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दही प्रोबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध आहे, तर आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी, फोलेट, पोटॅशियम, क्वेर्सेटिन आणि बीटा कॅरोटीन यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे, जे शरीराला संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. जर, तुम्हीही आंबे खाण्याचे शौकीन असाल, तर चला जाणून घेऊया त्यांच्यापासून बनवलेल्या लस्सीचे ७ वेगवेगळे चविष्ठ आणि हेल्दी प्रकार....

मँगो मिंट लस्सी

मँगो मिंट लस्सी बनवण्यासाठी एक कप आंब्याचा गर, दोन कप दही, ६-७ पुदिन्याची पाने, मॅपल सिरप आणि २-३ बर्फाचे तुकडे एकत्र करा आणि छान मिक्सरमधून फिरवून घ्या. तुमची मँगो मिंट लस्सी तयार आहे. त्याचा थंडगार आनंद घ्या.

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

मँगो कोकोनट लस्सी

मँगो कोकोनट लस्सी बनवण्यासाठी दोन वाट्या नारळाचे दुध, एक वाटी आंब्याचा पल्प, दोन कप दही आणि मॅपल सिरप घालून मिक्स करून त्याचा थंडगार आनंद घ्या.

मँगो स्ट्रॉबेरी लस्सी

मँगो स्ट्रॉबेरी लस्सी बनवण्यासाठी एक कप आंब्याचा गर, ३-५ स्ट्रॉबेरी, दोन कप दही आणि मध एकत्र मिसळून मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्या. बर्फाचे तुकडे घालून याचा आनंद घ्या.

मँगो अक्रोड लस्सी

मँगो अक्रोड लस्सी बनवण्यासाठी ८-१० अक्रोड भिजवून त्याची पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये एक कप आंब्याचा गार, दोन कप दही, मध आणि दालचिनी पावडर घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये छान वाटून घ्या. झाली तुमची मँगो अक्रोड लस्सी तयार!

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

मँगो चिया सीड्स लस्सी

मँगो चिया सीड्स लस्सीसाठी दोन चमचे भिजवलेल्या चिया सीड्स, एक कप आंब्याचा पल्प आणि दोन कप दही एकत्र करून त्यात चवीनुसार मध मिसळा आणि वाटून घ्या, त्यावर बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह करा

मँगो बदाम लस्सी

मँगो बदाम लस्सी बनण्यासाठी, एक कप आंब्याच्या पल्पमध्ये १२-१५ भिजवलेले बदाम, २ कप दही घालून चांगले मिसळा. आता त्यात मध आणि केवड्याचे पाणी घालून पुन्हा मिक्स करा. तुमची चविष्ठ मँगो बदाम लस्सी तयार आहे.

मँगो हळद लस्सी

आंबा हळद लस्सी तयार करण्यासाठी एक कप आंब्याचा पल्पसोबत, एक कप दही, एक चमचा हळद आणि चवीनुसार मध घालून चांगले मिसळा. तुमची आंब्याची हळद लस्सी तयार आहे.

WhatsApp channel
विभाग