Mango Juice Packaging Viral Video: लहान असो वा मोठे आंब्याचा रस प्यायला सर्वांनाच आवडते. फक्त उन्हाळ्यातच नाही तर अनेक जण बाराही महिने पॅकेज्ड मँगो ज्यूसचा आनंद घेतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की बाजारात मिळणाऱ्या पॅकेज्ड मँगो ज्यूसमध्ये आंबा आहे का? अलीकडेच इन्स्टाग्रामवरील एक कंटेंट क्रिएटरने एक ज्यूस प्रोसेसिंग प्लांटमधून एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मँगो ज्यूस उद्योगाची पोलखोल झाली आहे. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या दृश्यांमुळे लोकांचा मँगो ज्यूस पिण्याचा विश्वासच उडाला आहे. आपण जेव्हा पॅकेज्ड मँगो ज्यूस पितो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण शुद्ध आंबा रस पितो. पण हा व्हिडिओ पाहून आपल्याला हे समजेल की आपण किती दिवस फसवले जात होतो.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एका लोकप्रिय फूड ब्लॉगरने शेअर केला आहे. या ब्लॉगरने हा व्हिडिओ एका मँगो ज्यूस प्रोसेसिंग प्लांटमध्ये गुप्तपणे शूट केला आहे. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, मँगो ज्यूस बनवण्यासाठी खरंच आंब्यांचा वापर होत नाही. तर त्याऐवजी एका पिवळ्या रंगाच्या द्रव पदार्थाला रंग, साखर आणि इतर रसायने मिसळून मँगो ज्यूस बनवला जातो. या क्लिपमध्ये एक पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ लाल आणि केशरी फूड कलरिंग, शुगर सिरप आणि इतर रसायने एका चर्निंग मशीनमध्ये मिसळला जात आहे. नंतर प्रोसेस केलेला द्रव प्लास्टिक पेपर पॅकेट्सच्या बाटलींमध्ये कॅन केला जातो. शेवटी ते मोठ्या कार्टनमध्ये पॅकेज केले जातात आणि अनेक कामगारांच्या मदतीने विक्रेत्यांना डिलिव्हरीसाठी तयार केले जातात. हा व्हिडिओ "टेट्रा पॅक मँगो ज्यूस" या कॅप्शनसह शेअर केला गेला आहे.
व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेचच, इंटरनेट युजर्सनी कमेंट सेक्शन भरून टाकले. या व्हिडिओमुळे लोक खूपच निराश झाले आहेत. "मी आतापासून मँगो ज्यूस पिणे बंद करणार आहे. या व्हिडिओनंतर मला आंब्याचा रस पिण्याची इच्छाच उरली नाही." असे एका युजरने आपली निराशा व्यक्त केली. तर दुसऱ्या युजरने "सरकारने यावर तात्काळ कारवाई करावी. अशा कंपन्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे." अशी मागणी केली. "मला यावर विश्वासच बसत नाही. कदाचित हा व्हिडिओ एडिट केलेला असेल." असे सांगत काही युजर्स या व्हिडिओची सत्यताबद्दल शंका व्यक्त करत आहेत.
"आतापासून मी फक्त घरगुती आंबा रसच पिणार." असे सांगत काही युजर्स स्वतः घरी आंब्याचा रस बनवण्याचा निर्णय घेत आहेत. "या कंपनीवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यांनी लोकांच्या आरोग्याशी खेळ केला आहे." अशी मागणीही काही युजर्स करत आहेत. तर काही युजर्स सर्वच प्रकारच्या पॅकेज्ड ज्यूस पासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहेत.