मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  सावधान! कॅडबरीमध्ये आढळली जिवंत अळी, viral video ने उडाली खळबळ

सावधान! कॅडबरीमध्ये आढळली जिवंत अळी, viral video ने उडाली खळबळ

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 11, 2024 09:11 PM IST

Viral Video of Cadbury: एका एक्स युजरने कॅडबरी चॉकलेटमध्ये जिवंत अळी वळवळतांनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे खळबळ उडाली होती.

The image is taken from a video that shows a worm "crawling in Cadbury chocolate".
The image is taken from a video that shows a worm "crawling in Cadbury chocolate". (X/@RobinZaccheus)

Worm Crawling in Cadbury Video: एका व्यक्तीने एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी वळवळतांना दिसत आहे. कॅडबरी चॉकलेटचा तो खास पॅक त्याने हैदराबादच्या मेट्रो स्टेशनवरून खरेदी केल्याचा दावा केला आहे. एक्सपायर होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रोडक्टच्या गुणवत्तेच्या तपासणीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या या ट्विटवर चॉकलेट कंपनी कॅडबरीच्या प्रतिक्रियेसह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

एक्स युजर रॉबिन झॅचियसने चॉकलेटमध्ये असलेल्या अळीचा व्हिडिओ शेअर केला. ज्या दुकानातून त्याने वस्तू खरेदी केली, त्या दुकानातील बीलाच्या पावतीचा फोटो सुद्धा त्याने सोबत पोस्ट केला आहे.

"रत्नदीप मेट्रो अमीरपेट येथे खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये आज एक अळी वळवळताना आढळली. लवकरच इक्सपायर होणाऱ्या या प्रोडक्टची गुणवत्ता तपासली आहे का? सार्वजनिक आरोग्याच्या धोक्याला जबाबदार कोण?, असे त्यांनी लिहिले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये अनेक व्यक्ती आणि संस्थांना टॅग केले आहे.

कॅडबरी चॉकलेटमधील आढळलेल्या अळीबद्दलची ही पोस्ट पहा:

दोन दिवसांपूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या व्हिडिओला १२० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या ट्विटला ६०० पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. या शेअरवर प्रतिक्रिया देताना लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

कसा दिला कॅडबरीने प्रतिसाद?

चॉकलेट कंपनीने कमेंट सेक्शनमध्ये एक प्रमाणित उत्तर शेअर केले आहे. त्यांनी झॅकियसच्या "अप्रिय अनुभवाबद्दल" माफी मागितली आणि शेअर केले की ते नेहमीच "हायेस्ट क्वालिटी स्टँडर्ड राखण्याचा" प्रयत्न करतात. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी कंपनीने जॅकियसला त्याच्या संपर्काची माहिती शेअर करण्याची विनंती केली आहे.

एक्स युजर्सने पोस्टवर अशा दिल्या प्रतिक्रिया

"त्यांच्यावर खटला दाखल करा आणि नुकसान भरपाईचा दावा करा," असे एका एक्स युजरने सुचवले आहे. डिपार्टमेंटल स्टोअरच्या चुकीच्या साठवणुकीमुळे हे घडले आहे, अशी प्रतिक्रिया आणखी एकाने म्हटले आहे. "हा एक गंभीर मुद्दा आहे ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही," असे तिसरा युजर म्हणाला. "रॅपर असं का कापलं जातं? खरेदीपूर्वी पॅकेजिंग खराब झाले नाही याची खात्री कशी देता येईल?", असे चौथ्या व्यक्तीने लिहिले आहे.

WhatsApp channel

विभाग