Viral Video: आईस्क्रीम बनवण्यासाठी आणला चक्क अंगणातला स्नो, व्हायरल व्हिडिओने घातला इंटरनेटवर धुमाकूळ-man scoops snow from outside to make ice cream viral video set the internet abuzz ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral Video: आईस्क्रीम बनवण्यासाठी आणला चक्क अंगणातला स्नो, व्हायरल व्हिडिओने घातला इंटरनेटवर धुमाकूळ

Viral Video: आईस्क्रीम बनवण्यासाठी आणला चक्क अंगणातला स्नो, व्हायरल व्हिडिओने घातला इंटरनेटवर धुमाकूळ

Jan 23, 2024 07:23 PM IST

Ice cream Making Video: बाहेरून गोळा केलेल्या बर्फापासून आईस्क्रीम बनवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला २७ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

अंगणातील स्नोपासून आईस्क्रीम बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हायरल व्हिडिओ
अंगणातील स्नोपासून आईस्क्रीम बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हायरल व्हिडिओ

Making Ice cream With Outside Snow: अंगणातून बर्फ उचलून आईस्क्रीम बनवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्याने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती या स्नोमध्ये वेगवेगळे घटक मिसळून एक डिश बनवतो आणि मग खातो. या क्लिपमुळे इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओबाबत दोन गटात चर्चा रंगली आहे. काहीजण या रेसिपीने प्रभावित झाले आहे तर काहींनी स्नो खाणे 'डिसगस्टिंग' असल्याचे मत व्यक्त केले.

इन्स्टाग्राम युजर आणि लेखक जिमी प्रोफिट यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. स्नो क्रीमची रेसिपी समजावून सांगणारे सविस्तर कॅप्शनही त्याने व्हिडिओसोबत पोस्ट केले आहे. त्याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की "स्नोक्रीम बनवण्याची वेळ आली!! दिवसभर येथे बर्फवृष्टी होत आहे. जेव्हा आम्ही उठलो तेव्हा तेथे सुमारे एक इंच होता आणि आता आमच्याकडे सुमारे ६ इंच स्नो आहे आणि अजूनही बर्फ पडत आहे.

 

"आता बऱ्याच लोकांकडे त्यांची रेसिपी असेल आणि मला खात्री आहे की ते सर्व चांगले आहेत. मी ते कसे करतो ते येथे आहे. आपल्याला एक बाउल स्वच्छ ताजे स्नो, साखर, बाष्पीभवन केलेले दूध आणि व्हॅनिलाची आवश्यकता असेल. प्रत्येकाचे प्रमाण हे आपल्याकडे किती बर्फ आहे आणि बर्फाचा टेक्सचर यावर अवलंबून आहे. हे बेस्ट, छान आणि फ्लफी होते. आयसी असताना ते तितकेसे चांगले नसते. बाष्पीभवन झालेले दूध थंड करा आणि शक्य असल्यास बाहेर तयार करा, जेणेकरून ते बनवताना ते सर्व थंड राहील, असेही त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगितले.

हा व्हिडिओ सात दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून या क्लिपला २७.३ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आले असून, हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्ह्युवची ही संख्या अजूनही वाढत आहे. या पोस्टवर अनेक लाइक्स आले आहेत. तर युजर्संनी वेगवेगळी मतं कमेंट केली आहे. एका युजर्सने या व्हिडिओवर अशी प्रतिक्रिया दिली आहे: "त्यामुळे स्नो खाणे किती डिसगस्टिंग आहे याबद्दल कोणीही बोलू इच्छित नाही?" तर दुसऱ्याने "मला ही रेसिपी ट्राय करायला आवडेल," असे म्हटले आहे. "बर्फ इतका घाणेरडा आहे," असे तिसऱ्या युजरने टिप्पणी केली. जर तुम्हाला बर्फ खाणे वाईट वाटत असेल तर या ग्रहावरून बाहेर जा. तो आकाशातून पडतो, पाईप नाही, रसायने नाहीत, ब्लीच नाही इत्यादी. आपल्यापैकी काहींना सोशल मीडियापासून दूर राहून बाहेर जाण्याची गरज आहे,' असा युक्तिवाद चौथ्या युजरने केला.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग