Viral Video : आजीबाई बनल्या फायर पुष्पा! नातवासोबत केला धमाल डान्स; व्हिडिओ पाहिलात का?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral Video : आजीबाई बनल्या फायर पुष्पा! नातवासोबत केला धमाल डान्स; व्हिडिओ पाहिलात का?

Viral Video : आजीबाई बनल्या फायर पुष्पा! नातवासोबत केला धमाल डान्स; व्हिडिओ पाहिलात का?

Jan 27, 2025 02:22 PM IST

Grandmother Dance Viral Video : ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ या गाण्यावर आजी आणि नातवाचा डान्स व्हायरल झाला आहे. त्यांनी आपल्या मनमोहक चालींनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

आजीबाई बनल्या फायर पुष्पा! नातवासोबत केला धमाल डान्स; व्हिडिओ पाहिलात का?
आजीबाई बनल्या फायर पुष्पा! नातवासोबत केला धमाल डान्स; व्हिडिओ पाहिलात का? (Instagram/sanket_dawalkar)

Grandmother Dance On Pushpa 2 Song Viral Video : ‘पुष्पा २ द रूल’ या चित्रपटातील 'अंगारों' या व्हायरल गाण्यावर एक व्यक्ती आणि त्याची आजी यांचा धमाल डान्स करतानाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ नेटकऱ्यांची मने जिकून घेत आहे. संकेत डवलकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये हा एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला आहे. या आजीबाई ‘पुष्पा २’ या चित्रपटात श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रश्मिका मंदानाच्या आयकॉनिक डान्स स्टेप्स अगदी आपल्या अंदाजात सहजपणे करताना दिसल्या आहेत.

परफेक्ट हार्मोनी, कमाल एनर्जी!

या व्हिडिओमध्ये संकेतची आजी 'अंगारों' गाण्याच्या तालावर मनमोकळेपणाने थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ सुरू होताच नातू संकेत देखील आजीसोबत या डान्समध्ये सामील होतो आणि दोघंही आपल्या सिंक्रोनाइज्ड डान्स परफॉर्मन्सने सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. संकेतने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले की, ‘माझ्या श्रीवल्लीसोबत’!

पहा व्हिडिओ :

नेटकऱ्यांनी केला प्रेमाचा वर्षाव!

या संपूर्ण व्हिडिओने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला असून, काही तासांतच असंख्य लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. या दोघांची अप्रतिम केमिस्ट्री आणि आजीच्या उत्साही डान्स मूव्ह्सबद्दल कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव झाला. एका युजरने लिहिलं, ‘तिच्याकडे माझ्यापेक्षा जास्त स्वॅग आहे!’ तर दुसऱ्या एकाने लिहिलं की, ‘हे इतके सुंदर आहे की, यामुळे माझा दिवस खूप आनंदी झाला आहे.’ अनेक प्रेक्षकांनी आजीच्या या उत्साहाचे तोंडभरून कौतुक केले आणि एकाने कमेंट केली, "मला आशा आहे की, मी या आजीच्या वयाचा असताना तिच्यासारखा डान्स करू शकेन!' दुसऱ्या एकाने म्हटले की, ‘आजी खरोखरच सर्वोत्तम डान्स पार्टनर आहेत’. 

Viral Video: आधी छुपा कॅमेराद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, नंतर स्वतःच दिली विवाहबाह्य संबंधाची कबूली

या व्हिडिओने प्रेक्षकांमध्ये ही नॉस्टॅल्जिया निर्माण केला. याविषयी बोलताना एक जण म्हणाला की, ‘हे मला माझ्या आजीची आठवण करून देत आहे, मौल्यवान आठवणी!’ अनेकांनी संकेतचे त्याच्या या सुंदर आणि हृदयस्पर्शी व्हिडिओसाठी कौतुक केले आहे. काही प्रेक्षकांना या आजी आणि नातवाची केमिस्ट्री देखील खूप आवडली आहे. एकाने म्हटले की, ‘तुम्ही दोघं एकत्र ज्या प्रकारे डान्स करता ते खूप धमाकेदार आहे!’ हा व्हिडिओ इंटरनेटवर सगळ्यांचाच उत्साह वाढवत आहे.

Whats_app_banner