मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: खांदे आणि पाठदुखीपासून आराम देईल मलायका अरोराचा 'टू मिनिट' योग

Yoga Mantra: खांदे आणि पाठदुखीपासून आराम देईल मलायका अरोराचा 'टू मिनिट' योग

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 02, 2024 09:22 AM IST

Malaika Arora's Video For Shoulder And Upper Back Pain: जर तुम्ही अनेकदा पाठ आणि खांद्याच्या दुखण्याने त्रस्त असाल तर मलायका अरोराच्या या 'टू मिनिट' योगचा व्हिडीओ पाहा. तिने सांगितलेले व्यायाम प्रकार तुमच्या रुटीनमध्ये आणा...

Malaika Arora's Video For Shoulder And Upper Back Pain
Malaika Arora's Video For Shoulder And Upper Back Pain

Malaika Arora's Video For Shoulder And Upper Back Pain: तासनतास कॉम्प्युटरसमोर बसणे, चुकीच्या अवस्थेत झोपणे किंवा जड वस्तू उचलणे यामुळे लोक अनेकदा खांदे आणि पाठदुखीच्या तक्रारी करतात. खांदे आणि पाठीच्या असह्य दुखण्यामुळे माणसाला आपली दैनंदिन कामे करण्यातही खूप अडचणी येऊ लागतात. यावर उपाय म्हणून नियमित व्यायाम आणि स्ट्रेचिंग दररोज केल्यामुळे वेदनांपासून आराम मिळू शकतो. अभिनेत्री मलायका अरोराने खांदे आणि पाठदुखीवर कोणता योग करावा याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

खांदे आणि पाठीचे दुखणे दूर करण्यासाठी व्यायाम

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मलायका अरोराने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अरोराने तिच्या चाहत्यांना खांदे आणि पाठदुखी होत असेल तर कोणता आणि कसा व्यायाम करावा हे सांगितले आहे. जर तुम्ही पाठ आणि खांद्याच्या दुखण्याने त्रस्त असाल तर मलायका अरोराच्या या 'टू मिनिट' व्यायामाचा दैनंदिन जीवनात समावेश करुन घ्या. जेणेकरुन तुमची पाट आणि खांदेदुखी तात्काळ आराम देऊ शकेल. चला पाहूया हा व्यायाम कसा करायचा...
वाचा : अशोक सराफ यांचा अनोखा लूक, 'लाईफलाईन' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

ट्रेंडिंग न्यूज

वाचा : डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात 'हे' हिंदी चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

खांदे आणि पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वप्रथम डाव्या हाताच्या मुठीत डंबल घ्या आणि डावा हात खाली ठेवून पाठीमागे घ्या. या स्थितीत आपल्या डाव्या हाताच्या मुठीत डंबलचा खालचा भाग असेल याची विशेष काळजी घ्या. आता उजवा हात वर ठेवताना पाठीमागे हलवा आणि डाव्या हाताला धरुन डंबलचे वरचे टोक धरण्याचा प्रयत्न करा.
वाचा : १२ वर्षांचं प्रेम आणि वाचवायला फक्त ५ तास, 'विषय हार्ड'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

यानंतर तुमच्या डाव्या हाताला डंबलचा खालचा भाग असेल आणि उजव्या हाताला डंबलचा वरचा भाग असेल. आता आपला डावा हात खाली खेचून उजवा हात वरच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना डंबलची दोन्ही टोके आपल्या डाव्या आणि उजव्या हाताच्या मुठीत आहेत याची खात्री करा. उजव्या हातात डंबल घेऊन ही प्रक्रिया पुन्हा करा. या व्यायाम रोजच्या रोज केल्याने खांदे आणि पाठ दुखी पासून आराम मिळेल.
वाचा : सोनाक्षीने शेअर केला जहीरचा व्हिडीओ, जगाला दाखवला खरा चेहरा

WhatsApp channel