Malaika Arora Fitness Tips: डान्सिंग क्वीन आणि अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा इन्स्टाग्रामवर स्वतःशी संबंधित गोष्टी शेअर करत असते. अभिनेत्री नेहमीच फिटनेसबाबत प्रेरणादायी संदेश पोस्ट करत असते. आता तिने नुकतीच एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. तिने नोव्हेंबरसाठी स्वतःला चॅलेंज देणारी 'टू-डू लिस्ट' पोस्ट केली आहे. यामध्ये तिने तिला आता काय काळजी घेणे आवश्यक आहे किंवा तिला आगामी काळात काय करण्याची आवश्यकता आहे, याबाबत सांगितलं आहे. विशेष म्हणजे अर्जुन कपूरने त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केल्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्रीची पोस्ट आली आहे.
मलायकाने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिचे नोव्हेंबर चॅलेंज सांगितले आहेत. ज्यात अल्कोहोल सोडणे, पुरेशी झोप घेणे, नियमित व्यायाम करणे आणि तुमच्या जीवनातून नकारात्मक लोकांना काढून टाकणे यासारख्या उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच प्रोसेस्ड फूड न खाणे, रात्री आठ नंतर न जेवणे, गुरूचा सल्ला घेणे हेसुद्धा लिहिण्यात आले आहे.
मलायका अरोरा पन्नाशीतही तिशीसारखी आकर्षक आणि फिट दिसते. ती दररोज न चुकता व्यायाम करत असते. अभिनेत्री सतत आपल्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. विशेष म्हणजे मलायका योगा आणि जिम दोन्ही करते. शिवाय ती उत्तम डाएटसुद्धा फॉलो करते. त्यामुळेच ती अत्यंत फिट दिसते. अनेक नवख्या अभिनेत्री तिच्याकडून फिटनेस प्रेरणा घेत असतात.
यापूर्वी, मलायकाने एक कोट शेअर केला होता, ज्यामध्ये लिहिले होते, 'प्रत्येक सकारात्मक विचार ही एक मूक प्रार्थना आहे . जी तुमचे जीवन बदलेल. शुभ सकाळ, तुमचा दिवस चांगला जावो. वास्तविक, नुकतेच अर्जुन कपूरने 'सिंघम अगेन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये मलायकासोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आपण आता सिंगल असल्याचे त्याने सांगितले होते. दरम्यान आता मलायकाने विषारी आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देत सर्वांनाच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.
मलायका आणि अर्जुनबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 2018 मध्ये डेट करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आपले नाते सीक्रेट ठेवले. पण नंतर त्यांनी ते सार्वजनिक केले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचे नाते अधिकृत केले होते. दोघेही अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले होते. दिवाळी पार्टीपासून फॅमिली गॅदरिंगपर्यंत मलायका आणि अर्जुन एकत्र दिसले. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर होते. पण आता दोघेही एकत्र नाहीत. काही काळापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. दरम्यान मलायका पुन्हा आपल्या शारीरिक आणि मानसिक फिटनेसवर लक्ष देत आहे.