Benefits of Eating Fox nut: मखाना हा पदार्थ अगदी सगळ्यांनाच माहिती आहे. मखाना हा कमळाच्या बिया म्हणूनही प्रसिद्ध आहे. या मखानाला असच रोस्ट करून खाल्लं जातं आणि याशिवाय यापासून अनेक पदार्थही बनवले जातात. मखानामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम व्यतिरिक्त, मखानामध्ये कॅल्शियम देखील जास्त प्रमाणात असते. यामुळे हे हाडांसाठी तसेच दातांसाठी चांगले असते. मखानामध्ये थायमिनचे प्रमाणही जास्त असते जे फायदेशीर ठरते. मखना खाण्याचे इतर फायदे काय आहेत?
> मखाना तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही राखते. यामुळे शरीरातील रक्तातील साखर योग्य राहते.
> मखानामुळे तुमची वाढलेल्या वजनाचीही समस्या सुटू शकते.
> मखनाच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हा हृदयासाठी सर्वात आरोग्यदायी आहार मानला जातो.
> जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर मखाना फायदेशीर ठरेल. मखानामध्ये आढळणारे केम्पफेरॉल नावाचे रसायन त्वचेला घट्ट करण्यासाठी, छिद्रांना घट्ट करण्यासाठी आणि काळे डाग हलके करण्यासाठी चांगले काम करते.
> मखानामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहते आणि आतड्याची हालचाल सुलभ होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या