Makeup Tips: पार्टी किंवा लग्न समारंभासाठी मेकअप करताय? मग अजिबात करू नका 'या' चुका, होईल फजिती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makeup Tips: पार्टी किंवा लग्न समारंभासाठी मेकअप करताय? मग अजिबात करू नका 'या' चुका, होईल फजिती

Makeup Tips: पार्टी किंवा लग्न समारंभासाठी मेकअप करताय? मग अजिबात करू नका 'या' चुका, होईल फजिती

Published Aug 02, 2024 11:24 AM IST

Makeup Tips In Marathi: वास्तविक पाहायला गेलं तर मेकअप करणे हीसुद्धा एक कला आहे. मेकअप करण्यापूर्वी त्याबाबत विविध लहान-लहान गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

मेकअप करताना अजिबात करू नका या चुका
मेकअप करताना अजिबात करू नका या चुका

Makeup Tips In Marathi: प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावे अशी इच्छा असते. त्यातल्या त्यात जर एकदा समारंभ असेल तर महिला अधिकच खुश असतात. महिला सुंदर दिसण्यासाठी विविध गोष्टी करत असतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे मेकअप होय. काहींना मेकअप करणे पसंत नसते. तर काहींना मेकअपची प्रचंड आवड असते. मेकअपसाठी त्या अनेक महागडे प्रॉडक्टस खरेदी करत असतात. मेकअपच्या आधारे अनेकजण आपला कॉन्फिडन्स वाढवतात. खरे तर आत्मविश्वासाने वावरणारी प्रत्येक महिलाच सुंदर असते. मात्र बदलत्या काळानुसार मेकअप हा जणू एक ट्रेंडच बनला आहे.

वास्तविक पाहायला गेलं तर मेकअप करणे हीसुद्धा एक कला आहे. मेकअप करण्यापूर्वी त्याबाबत विविध लहान-लहान गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. बहुतांश महिलांना मेकअप करता येत नाही. अशावेळी त्या महिला बेसिक माहिती न घेताच अंदाजाने मेकअप करतात. परंतु असे केल्यास मेकअप चुकण्याची आणि तुमचा लूक खराब होण्याची शक्यता असते. तुमचा लूक खराब झाल्याने कार्यक्रमांमध्ये तुमची फजिती होऊ शकते. बऱ्याचवेळा कोणता प्रॉडक्ट कसा लावायचा ही माहिती न घेता मेकअप केल्याने तुमचा चेहरा विचित्र दिसून शकतो. त्यामुळेच या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला मेकअप करण्यापूर्वी या चुकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मेकअप बिघडू नये यासाठी काय करावे?

प्रॉडक्टसची माहिती घ्या

बऱ्याचदा महिला मेकअप तर करतात. परंतु त्यांना मेकअप पप्रॉडक्टसबाबत काहीच माहिती नसते. अशावेळी कोणता प्रॉडक्ट किती प्रमाणात आणि कसा वापरावा हेही माहिती नसते. त्यामुळे मेकअप बिघडण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच मेकअप करण्यापूर्वी त्या प्रॉडक्टसबाबत बेसिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

मेकअप करताना कोणत्या चुका टाळाव्या?

एखाद्या समारंभाला किंवा नियमितसुद्धा मेकअप करताना चेहरा धुतल्यानंतर थेट मेकअप लावण्याची चूक कधीही करू नका. कारण यामुळे तुमचा मेकअप अतिशय कोरडा आणि फुटकळ दिसतो. चेहरा धुतल्यानंतर नेहमी चेहऱ्याला आधी चांगले मॉइश्चरायझर लावा. त्यांनंतर मेकअपची प्रक्रिया सुरु करा. याशिवाय चांगल्या मेकअपसाठी फेस पावडर वापरू नका. फेस पावडर न लावल्याने मेकअप जास्त काळ टिकतो. फेस पावडर लावायची सवय असेल तर ती अतिशय जपून आणि योग्य प्रमाणात वापरा.

मेकअपमधील भेगा

बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात मेकअप चेहऱ्यावर लाऊनसुद्धा तो चांगला दिसत नाही. अशावेळी आपल्याला कलर करेक्टरच्या साहायाने किंवा मेकअप क्रीमच्या सहाय्याने हळुवार चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, खड्डे लपवता येऊ शकते. त्यानंतर पुढील प्रक्रिया केल्यास मेकअप नीट सेट होतो. याशिवाय मेकअपमध्ये भेगा दिसू लागल्या असतील तर हातात थोडी मेकअप क्रीम घ्या आणि ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर अलगद लावा. त्यामुळे त्या भेगा निघून जातील.

लाईट्समध्ये मेकअप करू नका

पांढऱ्याशुभ्र प्रकाशात कधीही मेकअप करू नका. मेकअप नेहमी नैसर्गिक प्रकाशात करा. जर रात्रीची वेळ असेल तर पिवळ्या प्रकाशात मेकअप करा. पांढऱ्या किंवा मंद प्रकाशाच्या ठिकाणी मेकअप लावल्याने तुमचा मेकअप खूप लाईटवेट दिसू शकतो, ज्यामुळे तुमचा लुक पूर्णपणे खराब होऊ शकतो. .

 

Whats_app_banner