Tips to make makeup last longer: सौंदर्य वाढवण्यासाठी बहुतांश मुली मेकअप प्रोडक्ट्स वापरतात. पण काही वेळा त्यांना वापर करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे त्यांचा लूक खराब होतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलीने लिपस्टिक घेतली तर प्रत्येक मुलगी तिचे ओठ अधिक सुंदर दिसण्यासाठी तिचा वापर करते. परंतु काही तासांनंतर, लिपस्टिक हळूहळू ओठांमधून गायब होऊ लागते, ज्यामुळे ती आणखी वाईट दिसते.
तसेच उन्हाळ्यात घामामुळे किंवा पावसाळ्यातसुद्धा फाउंडेशन काळे-निळे पडू लागते. ज्यामुळे मेकअप खूप वाईट दिसतो. तुमच्यासोबतही असे काही घडू नये त्यामुळे आज आपण फाउंडेशन आणि लिपस्टिक लावण्याबाबत काही महत्वच्या टिप्स जाणून घेणार आहोत.
खरं सांगायचं तर, लिपस्टिकशिवाय सर्व मेकअप अपूर्ण आहे. बऱ्याचवेळा तुम्ही पार्टीला जाता आणि जेवताना किंवा पाणी पिताना तुमची लिपस्टिक निघून जाते. त्यामुळे तुमचा संपूर्ण मेकअप लुक खराब होतो. त्यामुळे एका खास ट्रिकने लिपस्टिक लावावी. यासाठी सर्वप्रथम, ओठांवर थोडेसे कन्सीलर किंवा प्राइमर लावा. यामुळे तुमच्या ओठांचे मॉइश्चरायझेशन देखील होते आणि लिपस्टिक जास्त काळ टिकते. यानंतर वॉटरप्रूफ लाइनर लावायला विसरू नका. आता तुमची लिपस्टिक लावा. त्यावर फेस पावडर किंवा बेबी पावडर हलक्या हाताने लावा. आणि टिश्यूच्या मदतीने लिपस्टिक सेट करा. या ट्रिकने तुमची लिपस्टिक दीर्घकाळ टिकेल.
फाउंडेशन लावण्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे घाम येताच चेहरा काळवंडू लागतो. अशा परिस्थितीत संपूर्ण मेकअप लुक पूर्णपणे खराब होतो. त्यामुळे उन्हाळ्यात फाउंडेशन लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व प्रथम, आपला चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा. यानंतर काही वेळ बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर चोळा. यामुळे तुमचे फाउंडेशन केवळ दीर्घकाळ टिकणारच नाही तर त्वचा चमकदार होण्यासही मदत होईल.
यानंतर चांगल्या मॉइश्चरायझरच्या मदतीने चेहऱ्याला हलकासा मसाज करा. ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने फाउंडेशन चांगले ब्लेंड करा. उन्हाळ्यात फक्त ऑईल फ्री फाउंडेशन निवडा. यानंतर फेस पावडरच्या मदतीने फाउंडेशन चांगला सेट करा. अशा प्रकारे तुमचा फाउंडेशन बराच काळ चांगला राहील. अजिबात काळा किंवा निळा पडणार नाही.