मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makeup Hacks: विंटरमध्ये नॅचरल आणि नॉन ऑइली मेकअप लूकसाठी ट्राय करा हे DIY हॅक्स

Makeup Hacks: विंटरमध्ये नॅचरल आणि नॉन ऑइली मेकअप लूकसाठी ट्राय करा हे DIY हॅक्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 26, 2023 01:52 PM IST

Winter Makeup Tips: विंटर सीझनमध्ये हेवी मेकअप केकी दिसायला लागतो. म्हणूनच कमीतकमी आणि नैसर्गिक मेकअप अधिक चांगला मानला जातो. येथे ५ टिप्स आहेत, ज्यामुळे तुमचा मेकअप ड्राय आणि केकी बनत नाही.

विंटर मेकअप टिप्स
विंटर मेकअप टिप्स

DIY Hacks for Natural and Non Oily Makeup Look: विंटर सीझन म्हणजे कोरडेपणा आणि निस्तेज त्वचा. अशा स्थितीत स्किन केअर प्रोडक्ट वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. कोणतेही चुकीचे प्रोडक्ट निवडणे त्वचेच्या अनेक समस्यांचे कारण बनते. म्हणूनच हिवाळ्यात मॉइश्चरायझर कधीही टाळण्याचा सल्ला दिला जातो. बदाम आणि खोबरेल तेल यांसारखे नैसर्गिक तेल देखील मसाजसाठी चांगले मानले जाते. पण जेव्हा हिवाळ्यातील मेकअपचा विचार केला जातो तेव्हा नॅचरल आणि मिनिमल मेकअप अधिक चांगला मानला जातो. कारण हिवाळ्याच्या कोरडेपणामुळे तुमचा मेकअप केकी आणि कोरडा होतो. म्हणून येथे ५ DIY हिवाळ्यातील मेकअप हॅक आहेत जे तुम्हाला हिवाळ्यात नॉन-केकी लुक मिळविण्यात मदत करतील.

मग हिवाळ्यात मेकअप कसा करायचा? किंवा तुमचा मेकअप नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणारा कसा ठेवायचा? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पहा हे ५ टिप्स, ज्यामुळे तुमचा मेकअप नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल.

हिवाळ्यातील मेकअप नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी ५ टिप्स

१. नॉन ऑइली मॉइश्चरायझर निवडा

हिवाळ्यात त्वचेमध्ये कोरडेपणाची समस्या वारंवार उद्भवते, अशा परिस्थितीत मॉइश्चरायझर टाळल्यास त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. पण बहुतेक मॉइश्चरायझर्समुळे त्वचा तेलकट आणि काळी पडते. जे तुमचा मेकअप लुक देखील खराब करू शकतात. अशावेळी नॉन ऑइली मॉइश्चरायझर वापरणे चांगले ठरू शकते.

२. फेशियल ऑइल वापरा

कमीत कमी मेकअपसाठी फेशियल ऑइलचा वापर अधिक चांगला सिद्ध होतो, यासाठी नैसर्गिक तेल वापरल्यास ते अधिक फायदेशीर ठरेल. फाउंडेशन किंवा कोणत्याही ग्लोइंग क्रीममध्ये चेहऱ्याचे तेल मिसळून, ते तुमच्या त्वचेवर चांगले सेट करेल आणि तुम्हाला नैसर्गिक लुक देईल.

३. फाउंडेशन टाळा

तुमच्या लक्षात आले असेल की अनेकदा फाउंडेशन वापरल्यानंतर चेहऱ्यावर थर दिसू लागतात. तुम्हालाही ही समस्या टाळायची असेल, तर फाउंडेशन टाळा. तुम्हालाही चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स किंवा पिगमेंटेशनची समस्या असेल तर बीबी आणि सीसी क्रीम कमी प्रमाणात वापरा. किंवा काळे डाग असतील तिथेच वापरा.

४. हिवाळ्यात पावडर उत्पादन वापरू नका

मेकअप सेट करण्यासाठी पावडर उत्पादने वापरली जातात, परंतु हिवाळ्याच्या हंगामात ते टाळणे आवश्यक आहे. कारण पावडर उत्पादने तुमची त्वचा आणखी कोरडी आणि निर्जीव बनवू शकतात. ज्यामुळे तुमचा किमान मेकअपही हेवी आणि केकी दिसू शकतो.

५. मॉइश्चरायझिंग लिपस्टिक

मॅट लिपस्टिक हिवाळ्यात तुमचे ओठ आणखी कोरडे आणि खडबडीत बनवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात क्रीमी लिपस्टिक वापरणे चांगले. तसेच, लिपस्टिक लावण्यापूर्वी मॉइश्चरायझिंग लिप बाम वापरणे आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग