Hurda Bhel Recipe : घरच्या घरी बनवा हिवाळा स्पेशल चटपटीत हुरडा भेळ! लगेच नोट करा रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hurda Bhel Recipe : घरच्या घरी बनवा हिवाळा स्पेशल चटपटीत हुरडा भेळ! लगेच नोट करा रेसिपी

Hurda Bhel Recipe : घरच्या घरी बनवा हिवाळा स्पेशल चटपटीत हुरडा भेळ! लगेच नोट करा रेसिपी

Published Feb 13, 2025 05:30 PM IST

Winter Special Hurda Bhel : हुरडा भेळ ही एक खास महाराष्ट्रातील खास खाद्यपदार्थ मोडते, जी खूपच चवदार तर लागतेच आणि पौष्टिकही असते.

घरच्या घरी बनवा हिवाळा स्पेशल चटपटीत हुरडा भेळ! लगेच नोट करा रेसिपी
घरच्या घरी बनवा हिवाळा स्पेशल चटपटीत हुरडा भेळ! लगेच नोट करा रेसिपी

Hurda Bhel Recipe In Marathi : हिवाळा अर्थात थंडीचा महिना सुरू झाला की,घराघरांत आणि बाजारात हुरडा दिसू लागतो. अनेकांच्या घरात स्पेशल हुरडा पार्टी देखील रंगते. हुरड्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यापैकी हुरडा भेळ ही एक खास महाराष्ट्रातील खास खाद्यपदार्थ मोडते, जी खूपच चवदार तर लागतेच आणि पौष्टिकही असते. हुरडा भेळ पापडी आणि चटपटीत चटणीसह बनवली जाते. हुरडा भेळ सर्व वयाच्या लोकांना आवडते आणि खासकरून कुटुंबाच्या छोट्या गेट-टू-गेदरसाठी नक्कीच बनवली जाते. तुम्ही देखील घरीच हुरडा भेळ बनवण्याचा विचार करत असाल तर रेसिपी लिहून घ्या.

साहित्य:

१ कप हुरडा

१ कप कुरमुरे

१/२ कप तळलेले शेंगदाणे

१/४ कप उकडलेला बटाटा

१/४ कप कांदा

१/४ कप टोमॅटो

१/४ कप काकडी

१ चमचा हिरवी मिरची

१ चमचा पाणीपुरी चटणी

१/२ चमचा लाल तिखट

१/२ चमचा चाट मसाला

१/२ चमचा जिरे पावडर

१/२ चमचा आल्याची पेस्ट

मीठ चवीनुसार

> एक कढई गरम करा आणि हुरडा परतून घ्या.

> एका मोठ्या पातेल्यात शेंगदाणे, कुरमुरे, बटाटा, कांदा, टोमॅटो, काकडी आणि हिरवी मिरची घाला.

> या सर्व मिश्रणात हुरडा आणि पाणीपुरी चटणी घालून चांगले मिक्स करा.

> चाट मसाला, तिखट पावडर, जिरे पावडर, आल्याचा पेस्ट आणि मीठ घालून पुन्हा एकदा सर्व गोष्टी चांगल्या प्रमाणात मिक्स करा.

> वरून थोडे कुरमुरे आणि कोथिंबीर घाला.

> हुरडा भेळ तयार आहे. चवीनुसार त्यात चटणी व दही ह्यांचा वापर करुन ह्याची चव आणखी वाढवू शकता.

> हुरडा भेळ एक अशी चवदार रेसिपी आहे, जिला प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीच्या मनात खास जागा आहे. हुरडा भेळ जेवणाच्या किंवा लंचच्या पर्याय म्हणून विविध ठिकाणी बनवली जाते. ताजा हुरडा आणि मसालेदार चटणी ह्यांची जोडी एक उत्कृष्ट चव देते.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner