Tips To Make Saffron Aloe Vera Night Cream: जर तुमचा चेहरा डल दिसत असेल तर मेकअपचे थर लावण्याऐवजी तो नैसर्गिकरित्या ग्लोइंग करण्याचा प्रयत्न करा. या कामात घरगुती उपाय तुमची मदत करतील. बर्याचदा मुली घरगुती उपायांकडे दुर्लक्ष करतात आणि केमिकल असलेले प्रोडक्टचा वापर करतात. पण ही घरगुती नाईट क्रीम लावल्याने तुम्हाला काही दिवसातच फरक दिसू लागतो. घरी केशरपासून नाईट क्रीम कशी बनवायची ते जाणून घ्या.
- त्वचेवर केशर लावण्याचे अनेक फायदे आहेत.
- त्यामुळे रंग सुधारण्यास मदत होते.
- ते चेहऱ्यावरील डाग हलके करतात.
- डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते.
- नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते आणि यूव्हीपासून संरक्षण करते.
- तसेच चेहऱ्यावरील दाग कमी होतात.
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर करून ते सुंदर आणि ग्लोइंग करायचे असेल तर तुम्ही ही नाईट क्रीम रोज वापरू शकता. ते कसे बनवायचे ते पाहा.
- १५-२० केशरच्या काड्या
- १ चमचा एलोवेरा जेल
- १ चमचा बदाम तेल
- १ कॅप्सूल व्हिटॅमिन ई
- १ चमचा गुलाब जल
सर्वप्रथम केशरच्या काड्या एखाद्या रुमालात गुंडाळून तव्यावर भाजून घ्या. आता केशरच्या काड्या एका छोट्या काचेच्या बाटलीत ठेवा. त्यात बदामाचे तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. मिक्स झाल्यावर त्यात काही थेंब गुलाब पाणी आणि एलोवेरा जेल टाका. हे सर्व नीट मिक्स करा. तुम्ही ते मिसळताच ते फोमसारख्या टेक्सचरमध्ये येईल. याला झाकण लावून बंद करा.
दररोज रात्री चेहरा स्वच्छ केल्यानंतर ही क्रीम लावा. काही दिवसातच चेहऱ्यावर फरक दिसू लागतील आणि या समस्या दूर होतील.
- चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होण्यास सुरुवात होईल
- त्वचेचा रंग हलका होऊ लागेल
- चेहऱ्यावर ग्लो दिसू लागेल
- काळे डाग दूर होतील
- स्किन एजिंग दिसणे थांबेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)