Best Places to Travel With Friends: सध्याच्या धावपळीच्या जीवनात थोडासा वेळ मिळाला तरी लोक कुठे ना कुठे फिरायला जाण्याचा आणि रिलॅक्स होण्याचा विचार करतात. त्यातही विषय मित्रांचा असेल तर व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकजण आपल्या मित्रांसाठी वेळ काढतो. मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी त्यांच्यासोबत ट्रिपला जाणे कधीही उत्तम असते. तुम्ही हे फेब्रुवारी महिन्यात करू शकता. या काळात थंडी कमी असते आणि उष्णता देखील नसते. अशा परिस्थितीत फिरायला जाण्यासाठी हा योग्य सीझन आहे. तुमच्या मित्रांना सुद्धा भटकंती करायला आवडत असेल तर त्यांच्यासाठी एक मजेदार आणि अविस्मरणीय ट्रिप करण्यासाठी तुम्ही या ५ ठिकाणी जाण्याचे प्लॅन करू शकता.
मित्रांसोबत मजा करण्यासाठी गोवा हे बेस्ट आणि ऑल टाईम फेव्हरेट डेस्टिनेशन आहे. गोवा बीचेससाठी प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लोकांना इथे जायला आवडते. येथील हिरवळ, वॉटर स्पोर्ट्स, धबधबे तुमची सहल संस्मरणीय बनवू शकतात. येथे होणाऱ्या पार्ट्या सुद्धा तुमची ट्रिप मजेशीर बनवतील.
महाबळेश्वर हे एक हिल स्टेशन आहे, जिथे हवामान आल्हाददायक असते. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. हे एक अतिशय सुंदर डेस्टिनेशन आहे. येथे तुम्ही मित्रांसोबत चिल करू शकता. मुंबईत राहणारे लोक वीकेंडला येथे जाऊ शकतात. येथे तुम्ही स्ट्रॉबेरी पिकिंग, बोटिंग, साइटसीइंग अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.
ऋषिकेश हे धार्मिक ठिकाण असले तरी हळूहळू ते एक उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे. इथे तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. हे हिल स्टेशन साहसी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध मानले जाते. येथे तुम्ही ट्रेकिंग, हायकिंग, बंजी जंपिंग आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. तुम्ही इथे मित्रांसोबत कॅम्पिंगचा आनंद सुद्धा घेऊ शकता.
हे कपल्सचे आवडते ठिकाण आहे. मॅक्लोडगंज हे पार्टी डेस्टिनेशन आहे. इथे तुम्ही मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करू शकता. येथून तुम्ही त्रिंड ट्रेक, दल सरोवर, नामग्याल मठ आणि भागसुनाग धबधबा देखील पाहू शकता.
लॅन्सडाउन
मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. हे ठिकाण उत्तराखंडच्या गढवालमध्ये आहे. इथे तुम्ही मित्रांसोबत रिलॅक्स वेळ घालवू शकता. शिवाय येथे सुंदर दृश्य पाहू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या