मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Hairstyle: उन्हाळ्यात करा हटके हेरअस्टाईल! गरमीही जाणवणार नाही

Summer Hairstyle: उन्हाळ्यात करा हटके हेरअस्टाईल! गरमीही जाणवणार नाही

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
May 13, 2023 12:11 PM IST

Deepika Padukone: उन्हाळ्यात गरमीमुळे शक्यतो हेअरस्टाईल केली जात नाही. सरळ केसांचा अंबोडा बांधला जातो. पण आम्ही अभिनेत्रीच्या काही हेअरस्टाइल सांगणार आहोत, जे स्टायलिश लूक देण्यासोबतच गरमीचा त्रासही होऊ देणार नाही.

Summer Hairstyle
Summer Hairstyle ( deepikapadukone / Instagram )

उन्हाळ्यात उष्माघात, उन्हाचा तडाखा, घाम येणे यामुळे खूप त्रास होतो. उन्हळ्यात ना कपडे ना मेकअप... कसलीच फॅशन करू वाटत नाही. पण अनेक ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेबल जायचं असतं. त्यामुळे तयार होणं हे आलंच. या सगळ्यात महत्त्वाची ठरते ती हेअरस्टाईल. उन्हाळ्यात जास्त हेअरस्टाईल केली जात नाही. कारण केसात सर्वाधिक घाम येतो. पण आम्ही अभिनेत्रीच्या काही हेअरस्टाइल सांगणार आहोत, जे स्टायलिश लूक देण्यासोबतच गरमीचा त्रासही होऊ देणार नाही. चला बघुयात कोणत्या आहेत या हेअरस्टाईल.

पोनीटेल

अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे स्टाईल क्वीन किंवा फॅशन आयकॉन मानले जाते. अभिनेत्रीचा हा लूकही खूपच जबरदस्त दिसत आहे. यामध्ये तिने स्लीक पोनीटेल हेअरस्टाइल कॅरी केली आहे. केसांना स्टायलिश बनवणारी ही स्टाइल उष्णतेपासूनही बर्‍याच प्रमाणात संरक्षण करते. यासोबतच ही हेअरस्टाईल लूकला आकर्षक बनवेल.

स्लीक बन

या हेअरस्टाईलमध्ये, डोक्याच्या अगदी वर एक अंबाडा (बन) बनविला जातो. यामध्ये केस घट्ट बांधले जातात जेणेकरून ते पसरू नयेत. त्यामुळे उष्णता कमी होते आणि तुम्ही काळजी न करता तुमचे काम पूर्ण करू शकता. उन्हाळ्यात या हेअरस्टाईलमुळे महिलांना हलके वाटते हे अनेक हेअरस्टाइलिस्टांनी मान्य केले आहे.

मेस्सी बन

उन्हाळ्यात लांब केसांमुळे जास्त गरमी जाणवते तुम्ही दीपिका पदुकोणप्रमाणे उन्हाळ्यात मेसी बन हेअरस्टाईल कॅरी करू शकता. ही हेअरस्टाईल कॅरी करणे देखील सोपे आहे. मेसी बन हेअरस्टाईल कुर्त्यापासून ते वेस्टर्न टॉप पर्यंत सगळ्यांवर शोभून दिसते.

WhatsApp channel