Valentine Day 2024: व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. याचा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. ९ फेब्रुवारी हा चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, आपण ज्याच्यावर प्रेम करतो आणि त्याला चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त केलं जातं. चॉकलेटची चव केवळ टेस्टी नसतेच तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने मूड सुधारतो, तणाव दूर होतो आणि मेंदूही सक्रिय राहतो. जर तुम्ही या निमित्ताने तुमच्या जोडीदाराला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर येथे जाणून घ्या चॉकलेट बॉक्सशिवाय इतर कोणते पर्याय आहेत.
चॉकलेट डेला गिफ्ट देण्यासाठी बाजारात खास चॉकलेट बुके खास तयार केले जातात. त्यात विविध प्रकारची चॉकलेट्स असतात. तुम्ही गिफ्ट शॉपमधून असा पुष्पगुच्छ खरेदी करू शकता किंवा तुमच्या जोडीदाराच्या आवडत्या चॉकलेट्स, फुलांचा फोम, बास्केटच्या मदतीने ते स्वतःही तयार करू शकता. ही भेट मिळाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला खूप आनंद होईल याची खात्री आहे.
जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला वेगळ्या पद्धतीने सरप्राईज करायचे असेल तर तुम्ही त्यांना चॉकलेटची ज्वेलरी भेट देऊ शकता. तुम्हाला गिफ्ट शॉपमध्ये चॉकलेट इअररिंगपासून नेकलेस आणि ब्रेसलेटपर्यंत अनेक पर्याय मिळतील.
चॉकलेट केक एक अतिशय टेस्टी पर्याय आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केक बाजारातून विकत घेऊन गिफ्ट करू शकता किंवा घरी बेक करून तुमच्या पार्टनरला सरप्राईज देऊ शकता.
चॉकलेट डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी चॉकलेट स्पा बुक करू शकता. नक्कीच, या स्पा नंतर त्यांचा मूड ताजेतवाने होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)