मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Khichdi Benefits: मकर संक्रांतला बनवली जाते खिचडी, वेट लॉससोबतच मिळतात आश्चर्यकारक फायदे

Khichdi Benefits: मकर संक्रांतला बनवली जाते खिचडी, वेट लॉससोबतच मिळतात आश्चर्यकारक फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 14, 2024 03:00 PM IST

Makar Sankranti Special: मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक लोक खिचडी बनवतात. खिचडी हे फक्त लाइट फूड नाहीये तर अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे फायदेशीर आहे. जाणून घ्या खिचडी खाण्याचे फायदे.

खिचडी खाण्याचे फायदे
खिचडी खाण्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Eating Khichdi: बरेच लोक रात्रीच्या जेवणात लाइट फूड म्हणून खिचडी खाणे पसंत करतात. हे अन्न पचायला सोपे आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मकर संक्रांतीला अनेक घरांमध्ये खिचडी तयार केली जाते आणि विशेषतः काही ठिकाणी ही दान केली जाते. तुम्हालाही वेट लॉस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर खिचडीशी मैत्री करा. तुमच्या आहारात खिचडीचा समावेश केल्याने तुम्हाला कोणते आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात ते जाणून घ्या.

खिचडी खाण्याचे फायदे

वेट लॉस

वाढत्या लठ्ठपणामुळे चिंतेत असाल तर खिचडी खा. खिचडी खाल्ल्याने वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी शरीरातील प्रोटीनची पातळी योग्य राखणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मूग डाळीची खिचडी खाऊ शकता. मूग डाळ खिचडीमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. खिचडी सहज पचते, ब्लोटिंग आणि लठ्ठपणा सारख्या समस्या दूर ठेवते. लक्षात ठेवा हिवाळ्यात रात्री देशी तुपासोबत खिचडी आणि उन्हाळ्यात दह्यासोबत खाल्ल्याने वजन वाढत नाही.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

अनेक वेळा केवळ गरोदरपणातच नाही तर बाहेरचे अन्न खाल्ल्याने सुद्धा व्यक्तीला बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास होऊ लागतो. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर खिचडी खाल्ल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते. खिचडी लवकर पचन झाल्यामुळे पोटात जडपणाची समस्या दूर ठेवते. ज्या लोकांना पोटाच्या समस्या जास्त असतात त्यांनी वेगवेगळ्या डाळींपासून बनवलेल्या खिचडीचे सेवन करावे.

पचन व्यवस्थित ठेवते

आयुर्वेदात खिचडी आतडे आणि पोटासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. कारण खिचडी बनवताना त्यात जास्त मसाले वापरले जात नाहीत. खिचडी पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे व्यक्ती सहजपणे आजारांना बळी पडत नाही.

शुगर नियंत्रणात ठेवते

मधुमेहाच्या रुग्णांसाठी खिचडीचे सेवन फायदेशीर आहे. याचे सेवन करणे केवळ शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठीच नाही तर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

 

पोषक तत्त्वांनी समृद्ध

खिचडी बनवण्यासाठी डाळीसोबत अनेक प्रकारच्या भाज्यांचाही वापर केला जातो. त्यामुळे खिचडीमध्ये भरपूर पोषक असतात. एक प्लेट खिचडीमध्ये बहुतांश जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. याशिवाय खिचडी केवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर एनर्जी लेव्हल वाढवून रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel