Makar Sankranti Recipe: मकर संक्रांतीला बनवा तिळाचा हलवा, वाढवा सणाचा गोडवा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makar Sankranti Recipe: मकर संक्रांतीला बनवा तिळाचा हलवा, वाढवा सणाचा गोडवा

Makar Sankranti Recipe: मकर संक्रांतीला बनवा तिळाचा हलवा, वाढवा सणाचा गोडवा

Jan 14, 2024 06:25 PM IST

Makar Sankranti Special: मकर संक्रांतीला तिळगुळासोबतच त्यापासून विविध पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. तुम्हाला काही नवीन करून पहायचे असेल तर तुम्ही तीळ आणि गूळ घालून हलवा बनवू शकता. जाणून घ्या याची रेसिपी.

तिळाचा हलवा
तिळाचा हलवा (freepik)

Til Halwa Recipe: मकर संक्रांतीनिमित्त तीळ आणि गुळापासून विविध पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. तिळगुळासोबतच तिळगुळाची पोळी, तिळाची बर्फी असे अनेक व्यंजन बनवी जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तिळगुळाचे लाडू खायला आवडतात. हे फक्त खायला टेस्टी नसतात तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. पण तुम्ही अजून तिळगुळाचे लाडू बनवले नसतील किंवा तुमच्याकडे लाडू बनवण्यासाठी वेळ नसेल तर हा तिळाचा हलवा बनवू शकता. तुम्ही अगदी १५-२० मिनिटांत टेस्टी आणि हेल्दी तिळाचा हलवा बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या याची रेसिपी.

तिळाचा हलवा बनवण्यासाठी साहित्य

- १/२ कप तीळ

- १/४ कप देशी तूप

- १/२ कप गूळ

- १/४ कप रवा

- १/२ चमचा वेलची पूड

- ड्रायफ्रुट्स

तिळाचा हलवा बनवण्याची पद्धत

- सर्वप्रथम तीळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. नंतर पाणी गाळून काढून टाका. तीळ रात्रभर भिजवले नसतील तर तासभर गरम पाण्यात भिजवून झाकून ठेवा. हे चांगले फुगतील.

- आता तिळाचे पाणी गाळून घ्या आणि हे भिजवलेले तीळ मिक्सरच्या भांड्यात बारीक करा. लक्षात ठेवा की ते पाण्याशिवाय बारीक करायचे आहेत. तिळामध्ये नैसर्गिक तेल असते जे ते बारीक करण्यास मदत करते.

- नंतर जाड तळाचे पॅन घ्या. त्यात तूप गरम करून मंद आचेवर रवा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

- रवा भाजल्यावर सोबत तीळ घाला. आता तीळ मंद आचेवर भाजून घ्या. हे सोनेरी होईपर्यंत यात सतत चमचा फिरवत राहा आणि भाजा.

- तीळ भाजून सोनेरी झाल्यावर अर्धी वाटी पाणी घाला. तसेच गुळाचे छोटे तुकडे करावेत. जेणेकरून गूळ सहज विरघळतो.

- आता हे नीट मिक्स करा. हे ढवळत असताना शिजवा.

- यातील पाणी सुकल्यावर आणि गूळ पूर्णपणे मिसळला की हलव्यात वेलची पूड घालून मिक्स करा.

- आता गॅस बंद करून त्यात बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घाला. तुमचा तिळाचा हलवा तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner