Tips to Do Instant Glow Facial at Home: कोणताही सण म्हटला की महिला सुंदर दिसण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून तयारी करतात. त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग करण्यासाठी ते कधी पार्लर तर कधी घरच्या घरी ब्युटी ट्रीटमेंट करतात. जानेवारी महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांतला फक्त एक दिवस उरला आहे. अशा परिस्थितीत जर या सणासाठी तुम्हाला त्वचेवर चमक हवी असेल तर तुम्ही २० मिनिटांत घरच्या घरी इन्स्टंट ग्लो फेशियल करू शकता. हे फेशियल करण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक गोष्टींची आवश्यकता असेल. चला तर मग जाणून घ्या हे फेशियल कसे करायचे.
क्लिंजर - फेशियलची पहिली स्टेप म्हणजे क्लिंजर. यासाठी २ टेबलस्पून हळद घ्या आणि त्यात २ टेबलस्पून संत्र्याच्या सालीची पावडर मिक्स करा. त्यात पुरेसे गुलाब जल टाकून पेस्ट बनवा. आता हे तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १-२ मिनिटे सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. आता थंड पाण्याने चेहरा धुवा आणि त्वचा कोरडी करा.
एक्सफोलिएट - स्क्रब बनवण्यासाठी ४ कप साखरेत हळद, ४ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल आणि १ टेबलस्पून जिंजर एसेंशियल ऑईल मिक्स करा. हे सर्व नीट मिक्स करून घ्या. साधारण २ ते ३ मिनिटे सर्कुलर मोशनमध्ये एक्सफोलिएट करा आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
मास्क - फेस मास्क बनवण्यासाठी २ चमचे पीठ, हळद, २-३ थेंब मध आणि दही मिक्स करा. हे सर्व नीट मिक्स केल्यानंतर हा मास्क चेहऱ्यावर लावा. साधारण १५ ते २० मिनिटे राहू द्या. मास्क धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. नंतर त्वचा नीट कोरडी करा
सीरम - फेस मास्क काढल्यानंतर चेहऱ्यावर सीरम लावा. यासाठी ३-४ चमचे एलोवेरा जेल घ्या. नंतर त्यात हळद, आर्गन ऑइल घाला. एलोवेरा जेल, हळद आणि आर्गन ऑइल एका काचेच्या ड्रॉपर बॉटलमध्ये मिक्स करा. आता झाकण बंद करा आणि सर्व चांगले मिक्स करा. तुमच्या चेहऱ्यावर हे सीरम लावा आणि सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या