मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: साबुदाणा खिचडी चिकट होते? ट्राय करा या टिप्स, होईल मोकळी आणि मऊ

Cooking Tips: साबुदाणा खिचडी चिकट होते? ट्राय करा या टिप्स, होईल मोकळी आणि मऊ

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 07, 2024 11:13 PM IST

Mahashivratri 2024 Special: महाशिवरात्रीला अनेक जण उपवास करतात. उपवासाला बनवली जाणारी साबुदाणा खिचडी चिकट होते अशी तक्रार अनेक महिला करतात. तुम्हाला साबुदाणा खिचडी मोकळी बनवायची असेल तर या टिप्स फॉलो करा.

साबुदाणा खिचडी मोकळी बनवण्यासाठी कुकिंग टिप्स
साबुदाणा खिचडी मोकळी बनवण्यासाठी कुकिंग टिप्स (unsplash)

Tips to Make Sabudana Khichdi Non Sticky: ८ मार्चला महाशिवरात्री साजरी होणार आहे. या दिवशी महादेवाचे भक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. उपवासाचे अनेक पदार्थ बनवले जात असले तरी साबुदाणा खिचडी हे सर्वांना आवडणारे आणि लवकर तयार होणारा पदार्थ आहे. पण अनेकदा महिला तक्रार करतात की त्यांची साबुदाणा खिचडी चिकट होते. जर तुमच्यासोबतही असेच होत असेल तर या टिप्स तुमची मदत करतील. या काही टिप्स फॉलो करून तुम्ही साबुदाणा खिचडी मोकळी आणि मऊ बनवू शकता.

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी कुकिंग टिप्स

१. साबुदाणा मोकळा होण्यासाठी ते नीट भिजणे आवश्यक आहे. साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला पाहिजे. किंवा किमान चार ते पाच तास पाण्यात भिजवावा.

२. साबुदाणा बनवण्यापूर्वी त्यातील पाणी पुर्णपणे काढून टाकण्यासाठी ते चाळणीत ठेवावे.

३. साबुदाणा शिजवण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करा. तुपामुळे साबुदाणा जळत नाही आणि चवही अप्रतिम लागते.

४. साबुदाणा नेहमी मंद आचेवर शिजवला पाहिजे.

५. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करा.

६. साबुदाणामध्ये बटाटा आणि शेंगदाणे घातले जातात. हे साबुदाणा चिकट होण्यापासून रोखते. यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे.

७. साबुदाणा विकत घेताना मोठे दाणे असलेला साबुदाणा घ्या. साबुदाण्याचे दाणे बारीक असतील तर तो चिकट होऊ शकतो. साबुदाणा खरेदी करताना काळजी घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel