मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mahashivratri 2024: महाशिवरात्रीचं व्रत करताना दिवसभर टवटवीत राहायचंय? मग, ‘हे’ पदार्थ नक्की खा!

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीचं व्रत करताना दिवसभर टवटवीत राहायचंय? मग, ‘हे’ पदार्थ नक्की खा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 08, 2024 12:19 PM IST

Mahashivratri 2024 Fasting Foods: महाशिवरात्रीच्या दिवसभराच्या उपवासात शरीराला थकवा जाणवू नये म्हणून आपल्या फालाहारात काही विशेष पदार्थांचा समावेश करायला हवा.

Mahashivratri 2024 Fasting Foods
Mahashivratri 2024 Fasting Foods

Mahashivratri 2024 Fasting Foods: आज (८ मार्च) महाशिवरात्रीचा हा खास दिवस देशभरात जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अनेकांनी आज महाशिवरात्री व्रत पाळण्याचा निर्धार केला असेल. भगवान महादेव आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून आज महाशिवरात्रीचं व्रत करण्याला फार महत्त्व आहे. दिवसभराच्या या उपवासात तुम्हाला थकवा जाणवू नये म्हणून आपल्या फालाहारात काही विशेष पदार्थांचा समावेश करायला हवा. या पदार्थांमुळे तुमच्या शरीराला उर्जा तर मिळेलच, पण शरीरात तरतरी राहील आणि थकवा देखील दूर होईल.

साबुदाणा : कोणत्याही प्रकारच्या उपवासात साबुदाणा हा उत्कृष्ट आहार आहे. साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा खीर खाल्ल्याने उपवासाच्या काळात दीर्घकाळ भूक लागत नाही आणि यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जाही मिळते. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, जे तुमच्या शरीराला दिवसभर सक्रिय आणि ताजेतवाने ठेवते.

मखाणा : उपवासाच्या पदार्थांमध्ये मखाणा देखील सामील आहे. उपवासाच्या दिवशी तुम्ही मखाणा खीर किंवा भाजलेले मखाणे खाऊ शकता. मखाणा हा प्रथिने आणि फायबरचा एक चांगला स्रोत आहे. मखाणे खाल्ल्याने तुमच्या शरीराला दीर्घकाळासाठी ऊर्जा मिळते.

Mahashivratri Bhog: महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा संत्र्याच्या खीरचा प्रसाद, बनवण्यासाठी पाहा रेसिपी

दही : दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. दही खाल्ल्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. दही खाल्ल्याने पोट देखील भरल्यासारखे राहते. यामुळे तुम्हाला भूक देखील लागत नाही. दही शरीर थंड ठेवण्याचे काम देखील करते.

नट्स आणि सुकामेवा : बदाम, अक्रोड आणि काजू यांसारखे नट्स आणि सुकामेवा हे शरीरासाठी ऊर्जादायक असतात. शिवाय हे शरीराची भूक देखील भागवतात. व्रत आणि उपवासाच्या काळात तुम्ही सुकामेवा देखील खाऊ शकता. यामुळे शरीरातील थकवा देखील दूर होईल.

फळे : उपवासात केळी, सफरचंद, पपई यासारखी फळे खाणे खूप फायदेशीर असते. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर युक्त फळे खाल्याने पोट बऱ्याच काळासाठी भरलेले राहते. फळे शरीरातील पाण्याची कमी भरून काढतात. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते. तसेच शरीरातील पाण्याची कमी भरून निघाल्याने उर्जा देखील राहते. उपवासाच्या काळात फळांचे सेवन अधिकधिक करणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे शरीरात उर्जा देखील टिकून राहते.

WhatsApp channel