Ratnagiri Travel: तुम्हाला जास्त लांब जायचं नसेल आणि शहरी गर्दीपासून नैसर्गिक (Natural Places to Travel Tips) वातावरणात काही दिवस शांततेत घालवायचे असतील तर आपल्या महाराष्ट्रापेक्षा (Maharashtra) उत्तम कोणती जागा असेल. तुम्ही महाराष्ट्रातील रत्नागिरीला जाण्याचा प्लॅन करू शकता. तिकडची शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण तुमचा सर्व थकवा दूर करेल. महाराष्ट्राच्या कोकण भागात वसलेले रत्नागिरी एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला पर्वतांनी वेढलेले आहे. वर्षातील बहुतेक महिने येथील हवामान आल्हाददायक असते. रत्नागिरीत निसर्गप्रेमींसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारताचा समृद्ध इतिहास जाणून घेण्यात तुम्हाला रस असेल, तर त्या दृष्टीनेही इथे काही जागा आहेत. रत्नागिरीचा हापूस तर जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने म्हणजे फेब्रुवारी ते मार्च आहे. तुम्ही येथे कसे जाऊ शकता आणि कोणती ठिकाणे भेट देण्यासारखी आहेत? संपूर्ण तपशील जाणून घ्या.
रत्नागिरीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने फेब्रुवारी ते मार्च आहेत.
रत्नागिरीला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे. तर याचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कोकण आहे.
रत्नदुर्ग हा शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये भगवतीचे मंदिर आहे, त्यामुळे त्याला भगवती किल्ला असेही म्हणतात. १२० एकर पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला हा किल्ला बहमनी काळात बांधला गेला. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिल शहाकडून ते जिंकले. येथून अरबी समुद्र आणि रत्नागिरी बंदरावर लक्ष ठेवता येते.
गणपतीपुळे हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. रत्नागिरी हे फार प्रसिद्ध देवस्थान आहे. गणपतीपुळे हे ४०० वर्ष जुन्या स्वयंभू मंदिरासाठी ओळखले जाते. सुमारे ६०० वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थांना केवडे जंगलात खडक खोदताना गणेशाची ही मूर्ती सापडल्याचे मानले जाते. हे भारतातील आठ गणपती मंदिरांपैकी एक आहे आणि पश्चिम देवर देवता म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की मंदिराची प्रदक्षिणा करणे फार फायदेशीर ठरते.
कोकण म्हंटल की बीचेस आलेच. कोकणात अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. आरे-वारे हा जुळा समुद्रकिनारा आहे. एका बाजूला आरे बीच आहे मध्यभागी एक पूल आहे आणि दुसऱ्या बाजूला वारे बीच आहे. समुद्रकिना-यावर काही ठिकाणी काळी वाळू तर इतर ठिकाणी पांढरी वाळू आणि सर्वत्र पामची झाडे आहेत. जे त्याचे सौंदर्य द्विगुणित करते. हा बीच इतका स्वच्छ आहे की तुम्ही इथे पाण्यात तुमचा चेहरा पाहू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या