महाराष्ट्र कृषी दिन हा १ जुलै रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील कृषी क्रांतीला नवे आयाम देणारे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी राज्याच्या अर्थव्यवस्थेत आणि अन्न सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शेतकरी व कृषी कामगारांच्या प्रयत्नांचे, योगदानाचे महत्त्व सांगितले जाते. कृषी दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो आणि शेती विषयी जागृकता देखील निर्माण केली जाते. राज्यातील काही दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर वाचा...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी 'बळीराजा... माझ्या महाराष्ट्राची शान! राज्यातील कृषिक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती 'कृषिदिन' म्हणून साजरी केली जाते. आपल्या बळीराजाविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला 'कृषिदिना'च्या हार्दिक शुभेच्छा!' अशी पोस्ट केली आहे.
वाचा: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या? 'या' हिंदी शायरी नक्की पाठवा
'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन' अशी पोस्ट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे.
वाचा: किचन गार्डनमध्ये असलेल्या रोपांना द्या घरगुती खत, पावसाळ्यात येतील चांगली फळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंतराव नाईक यांचा फोटो शेअर करत, "दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या मदतीनं प्रगत व पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी झटणारे, कापूस एकाधिकार योजना, धवल क्रांती, 'पाणी अडवा, पाणी जिरवा' यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सर्व शेतकरी बांधवांना 'कृषिदिना'च्या शुभेच्छा!" असे म्हटले आहे.
वाचा: पावसाळ्यात ‘हे’ पौष्टिक पदार्थ खाणे टाळा, नाहीतर प्रकृतीमध्ये होईल बिघाड
माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "वर्षभर शेतात कष्ट करून काळ्या मातीतून सोनं पिकविणाऱ्या बळीराजाला महाराष्ट्र कृषी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!" असे म्हटले आहे.
शाश्वत शेती पद्धती, जलसंधारण आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाविषयी जागरुकता निर्माण करण्याची संधी म्हणून महाराष्ट्रा कृषी दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनमान वाढवण्याच्या उद्देशाने उपक्रमांवर, शेतकऱ्यांसाठी सहाय्यक प्रणाली आणि कृषी उत्पादकता यांवर चर्चा करण्यात येते. तसेच कृषी क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनाच्या भूमिकेवरही भर देण्यात येतो.
संबंधित बातम्या