Instant Maggi Snacks Recipe: तुम्हीसुद्धा मॅगीचे शौकीन असाल पण रोज रोज तीच मॅगी खाण्याचा कंटाळा आला असेल, तर मॅगीची ही नवीन रेसिपी तुमच्या प्रचंड उपयोगी पडणार आहे. मॅगीच्या या नवीन रेसिपीचे नाव आहे मॅगी चीज बॉल्स. ही रेसिपी प्रसिद्ध शाकाहारी मास्टर शेफ तरला दलाल यांची आहे. जी तुम्ही तुमची सौम्य भूक भागवण्यासाठी सकाळी नाश्त्यासाठी किंवा सांयकाळी चहासोबत सर्व्ह करू शकता. मॅगी चीज बॉल्सची रेसिपी खायला चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग विलंब न करता टेस्टी मॅगी चीज बॉल्स कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
-२ कप मॅगी नूडल्स
-१/४ कप बारीक चिरलेला कांदा
-१/४ कप बारीक चिरलेली सिमला मिरची
-१/४ कप बारीक चिरलेली कोबी
- १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
- १ चमचे मॅगी चव मेकर
- १/४ टीस्पून हळद पावडर
- 1 टेबलस्पून मैदा
- 1 टीस्पून कॉर्नफ्लोर
- चवीनुसार मीठ
- १/३ कप पाणी
- ३ चमचे मैदा
- ३ चमचे कॉर्नफ्लोर
- १ टीस्पून मॅगी चव मेकर
- चवीनुसार मीठ
लहान पनीरचे तुकडे
-२ कप मॅगी नूडल्स
-तळण्यासाठी तेल
मॅगी चीज बॉल्स बनवण्यासाठी प्रथम कॉर्नफ्लॉवर घोळ तयार करून घ्या. त्यासाठी एका भांड्यात ३ टेबलस्पून मैदा, ३ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १ टेबलस्पून मॅगी स्वाद मेकर, मीठ आणि अर्धा कप पाणी घालून सर्वकाही चांगले एकजीव करून त्याचा पातळ असा घोळ तयार करा.
आता दुसऱ्या भांड्यात २ वाट्या उकडलेले मॅगी नूडल्स, १/४ कप चिरलेला कांदा, १/४ कप बारीक चिरलेली सिमला मिरची, १/४ कप कोबी, १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, २ टेबलस्पून मॅगी चव मेकर, त्यात एक चमचा हळद, एक टेबलस्पून मैदा, एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि चवीनुसार मीठ घालून सर्वकाही चांगले एकजीव करून घ्या. आता या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवा आणि वरून थोडेसे सपाट करा. यानंतर, या बॉलच्या मध्यभागी चीजचा एक तुकडा ठेवून गोळे पुन्हा बंद करून घ्या.
आता हा मॅगीचा गोळा आधीच तयार केलेल्या कॉर्नफ्लोअरच्या पातळ मिश्रणात बुडवून घ्या. मॅगीचा चुरा बॉल्सवर लावून घ्या. आता कढईत तेल गरम करा आणि मॅगीचे गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. तुमचे चविष्ट मॅगी चीज बॉल्स तयार आहेत. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या स्नॅकमध्ये तुम्ही चहा आणि सॉससोबत सर्व्ह करू शकता.
संबंधित बातम्या