Foods to increase immunity power: आपण घेत असलेल्या आहाराचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आपण कोणत्या प्रकारचे पदार्थ खातो त्यानुसार शरीरामध्ये विविध बदल दिसून येतात. शिवाय आपण खात असलेल्या पदार्थांमुळे आपले शरीर तर निरोगी राहतेच पण आपला चेहराही तितकाच चमकदार आणि तरुण दिसतो. त्यामुळेच आपण काय आणि कसे खावे या गोष्टींना प्रचंड महत्व आहे. त्यामुळे नेहमीच निरोगी आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. बॉलिवूडची धकधक गर्ल आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अशाच चिरतरुण सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्री वयाच्या पन्नाशीतसुद्धा इतकी फिट कशी? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षितच्या याच तारुण्यामागील खास कारण सांगणार आहोत.
खरं सांगायचं झालं तर, माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या आहारात कोणते ६ सुपरफुड्स समाविष्ट असले पाहिजेत, याबाबत खुलासा केला आहे. या आहाराने आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते, आजार दूर राहतात, आपला फिटनेस चांगला राहतो. आणि फिटनेस चांगला राहिल्यास आपल्या चेहऱ्यावरसुद्धा एक चमक राहते. डॉ. नेने हे एक हृदयरोग तज्ज्ञ आहेत. ते सतत सोशल मीडियावर आरोग्यासंबंधित गोष्टी शेअर करत असतात.
डॉ. नेनेंनी सांगितलेल्या ६ सुपरफुड्समध्ये हळदीचासुद्धा समावेश होतो. हळदी जेवणाची चव तर वाढवतोच पण त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. जे जळजळ कमी करण्यास मदत करते. शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
आले आपण दररोजच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खात असतो. आल्यामध्ये असलेले जिंजरॉल तत्वदेखील जळजळ कमी करते. आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
लिंबूवर्गीय फळे केवळ चवीलाच चांगली नसतात, तर त्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. शिवाय चेहऱ्यावर चमकदेखील आणते.
दही हे चवीला तर उत्तम असतेच. शिवाय त्याचे अफाट आरोग्यविषयक फायदेही आहेत. दह्याचे सेवन हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. दह्यामुळेदेखील त्वचेवर चमक येते.
रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीराला रोगांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला व्हायरल इन्फेक्शन, जिवाणू संक्रमण आणि इतर आरोग्य समस्यांशी लढण्यास मदत करते. लाल शिमला मिरची रोग प्रतिकारक स्गक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
पालक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावतात. शिवाय पालक खाल्याने त्वचादेखील चांगली बनते.