मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Destination Wedding: भारतातील ही ठिकाणं डेस्टिनेशन वेडिंगसाठी आहेत योग्य! कमी बजेटमध्ये करा प्लॅनिंग

Destination Wedding: भारतातील ही ठिकाणं डेस्टिनेशन वेडिंगसाठी आहेत योग्य! कमी बजेटमध्ये करा प्लॅनिंग

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 24, 2022 11:35 AM IST

Wedding Tips: जाणून घ्या भारतातील लो बजेट डेस्टिनेशन वेडिंग ठिकाणांबद्दल....

डेस्टिनेशन वेडिंग
डेस्टिनेशन वेडिंग (Freepik)

गेल्या काही वर्षांत डेस्टिनेशन वेडिंग खूप लोकप्रिय होत आहेत. गेल्या काही वर्षांत डेस्टिनेशन वेडिंग हा ट्रेंड बनला आहे. काही लोक परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंगचे स्वप्न पूर्ण करतात, तर काही भारतात लग्न करून आनंदी होतात. यापैकी बहुतेक वेडिंग डेस्टिनेशन खूप महाग आहेत.परंतु आज आम्ही तुम्हाला भारतातील लो बजेट डेस्टिनेशन वेडिंग ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जी मध्यमवर्गीय कुटुंबाला सहज परवडतील. चला जाणून घेऊयात भारतातील सर्वोत्तम आणि कमी बजेट डेस्टिनेशन वेडिंग ठिकाणांबद्दल...

गोवा

तुमचे बीच डेस्टिनेशन वेडिंगचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात तुमच्या बजेटमध्ये लग्न करता येईल. गोव्यात अनेक उत्तम ठिकाणे आहेत. ऑफ सीझनमध्ये लग्नाचे नियोजन केल्याने तुम्हाला चांगल्या डील्स मिळू शकतात. तुम्ही १० ते १५ लाखांमध्ये लग्नाचा प्लॅन करू शकता.

उदयपूर

भव्य राजवाडे आणि मोठ्या किल्ल्यांमध्ये लग्न करायचे असेल तर उदयपूरपेक्षा चांगले दुसरे काहीही असू शकत नाही. शाही विवाहासाठी उदयपूर हे योग्य ठिकाण असू शकते. येथे तुम्ही १२ लाख रुपयांमध्ये लग्न करू शकता.

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे वेडिंग डेस्टिनेशनसाठी योग्य ठिकाण आहे. या ठिकाणी लग्न करण्याचा विचारही योग्य ठरेल. तिथल्या सुंदर वातावरणचा केवळ वधू-वरच नाही तर पाहुणे देखील पूर्ण आनंद घेऊ शकतील.

जिम कॉर्बेट

जिम कॉर्बेट हे उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध वेडिंग डेस्टिनेशन बनले आहे. ज्या जोडप्यांना निसर्गाच्या कुशीत सात फेरे घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. येथे तुम्ही १५ लाख रुपयांमध्ये लग्न करू शकता.

WhatsApp channel