जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्हाला याचा त्रास होत असेल, तर एक उपाय तुम्हाला खूपच मदत करू शकतो. यामध्ये तुम्हाला जास्त घाम गाळण्याचीही गरज नाही आणि तुम्हाला कठीण डाएटही करावा लागणार नाही.
जर महिलांनी दोन आठवडे दररोज हळद आणि आल्याचा रस प्यायला तर पोट कमी होऊ शकते. यामुळे जुनाट आजारही टाळता येतात. हा उपाय तुमच्या मांड्या आणि हातावरील लटकलेली चरबी देखील काढून टाकू शकतो.
महिलांना त्यांची त्वचा निरोगी आणि तरुण ठेवायची असते. यासाठी महिलांनी काकडी आणि ओवा यांचा ज्यूस प्यावा. दोन आठवडे दररोज असे केल्याने त्वचेच्या समस्या दूर होतील. यामुळे पोटातील ऍसिड कमी होईल.
तज्ज्ञांच्या मते, दोन आठवडे दररोज बीटरूट आणि गाजराचा रस प्यायल्याने महिलांची एनर्जी लेव्हल वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. जे वारंवार आजारी पडतात त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय ठरू शकतो.
महिलांना हाडांच्या कमकुवतपणाचा धोका जास्त असतो. दोन आठवडे दररोज लिंबू आणि द्राक्षाचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. यासोबतच हाडांचे आरोग्यही सुधारेल.
तज्ज्ञांनी सांगितले की, जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर तत्त्व तेच राहील. तुम्हाला कॅलरीजची कमतरता राहावी लागेल. अन्यथा तुम्हाला कोणताही परिणाम मिळणार नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या