श्रावण महिना सुरु झाला की महादेवाची पूजा केली जाते. अनेकदा लोकं दर सोमवारी मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतात. जाताना फुले घेऊन जातात आणि देवाला अर्पण करतात. विशेषतः काही फुले भगवान शंकराला अत्यंत प्रिय असतात. ज्यामध्ये चमेली आणि नीलकंठ या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही दोन्ही फुले अर्पण केल्याने शिव लवकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की या फुलांचे केवळ धार्मिकच नाही तर आयुर्वेदातही अनन्यासाधारण महत्त्व आहे. ही फुले पाण्यात मिसळून प्यायल्याने अनेक आजारांपासून सुटका होते.
महादेवाला आवडणारी कोणती फुले पाण्यात टाकून प्यायल्याने शरीराला फायदा होतो चला जाणून घेऊया...
चमेलीच्या फुलांना सदाफुल देखील म्हटले जाते. भगवान शंकराला ही फुले आवडतात. चमेलीच्या फुलांचा चहा प्यायल्याने लिव्हर सिरोसिससारख्या आजारात दुखण्यापासून आराम मिळतो. त्याचबरोबर चमेलीचे तेल अंघोळ करताना पाण्यात घातले तर त्वचेशी संबंधीत समस्या कमी होतात. चमेलीचा चहा बनवण्यासाठी त्याचे फूल गरम पाण्यात टाकून दोन ते तीन मिनिटे उकळू द्या. नंतर चहा बनवण्यासाठी लागणारे सर्व सामान या पाण्यात टाका. हा उकळलेला चहा तुम्हाला हवा तेव्हा प्या.
-आयुर्वेदानुसार चमेलीच्या फुलांपासून बनवलेला चहा प्यायल्याने नैराश्य आणि तणावात आराम मिळतो.
-यामुळे मन स्थिर होते आणि निद्रानाशही दूर होतो.
-चमेलीची फुले पाण्यात ते पाणी उकळा. या पाण्याने केस धुवा. असे केल्याने केस रेशमी आणि चमकदार होतात.
निळ्या रंगाचे अपराजिता फूल भगवान शंकराला प्रिय आहे. असे मानले जाते की हे फूल शिवलिंगावर अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. अपराजिताच्या फुलापासून बनवलेला चहा लोकांना ब्लू टी म्हणून माहित आहे. अपराजिताची फुले गरम पाण्यात टाकून साधारण ३-४ मिनिटे उकळावे. फुलाचा रंग पाण्यात उतरल्यावर ते पाणी प्यावे. हा चहा आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असतो.
वाचा: किचन सिंक वारंवार ब्लॉक होत असेल तर जाणून घ्या कसे साफ करावे, वाचा सोप्या टिप्स
-अपराजिताच्या फुलापासून बनवलेला चहा प्यायल्याने निद्रानाश, मायग्रेन आणि अंगदुखी दूर होते.
-पचन सुधारण्यास मदत होते
-जे लोक तणावात आहेत आणि त्यांनी ब्लू टी प्यावा. यामुळे निद्रानाश दूर होतो.
-हा चहा प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण राहते
-स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा चहा प्यायला जातो
-ब्लू टी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि डोळे निरोगी राहतात
-हा चहा वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
संबंधित बातम्या