मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Haunted Places Of India: 'ही' आहेत भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे, जाण्यापूर्वी नक्की विचार करा

Haunted Places Of India: 'ही' आहेत भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे, जाण्यापूर्वी नक्की विचार करा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 02, 2024 04:33 PM IST

Haunted Places Of India: भारतात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे असली तरी काही ठिकाणी जाण्यापूर्वी त्यांच्याबद्दल जाणून घेणे गरजेचे असते. कारण काही ठिकाणे ही भीतीदायक मानली जातात. या ठिकाणांविषयी जाणून घ्या...

Haunted Places: भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे,
Haunted Places: भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे, (Shutterstock )

आपला भारत हा एक सुंदर देश आहे. आपल्या देशात फिरण्यासारखी अनेक वेगवेगळी ठिकाणे आहेत. देशातील काही ठिकाणी वाळवंट आहे, काही ठिकाणी सुंदर समुद्रकिनारे आहेत तर काही ठिकाणी डोंगराळ भाग आहे. आपल देश जगभरात सुंदर ठिकाणांसाठी विशेष ओळखला जातो. देशातील काही ठिकाणी लोक कुटुंबीयांसोबत फिरायला जाताना दिसतात तर काही ठिकाणे ही केवळ हनीमूनसाठी प्रसिद्ध आहेत. पण भारतात अशी देखील काही ठिकाणे आहेत जेथे जाण्यापूर्वी तुम्ही दहा वेळा विचार कराल.

तुम्ही भारतातील अनेक प्रेक्षणीय ठिकाणांबद्दल ऐकलं असेल, पण इथल्या भीतीदायक ठिकाणांबद्दल कधी ऐकले आहे का? होय, भारतात अशी काही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत जी सर्वात भीतीदायक ठिकाणांच्या यादीमध्ये देखील येतात. असे म्हटले जाते की या ठिकाणी भूत-प्रेतांचा वास आहे. चला जाणून घेऊया ही ठिकाणे भारतात आहेत तरी कुठे?
वाचा: पावसाळ्यात त्रास देऊ शकतात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या, या उपायांनी मिळेल आराम

१) थ्री किंग्ज चर्च, गोवा

हे गोव्यातील असेच एक चर्च आहे जे पाहण्यासाठी सर्वाधिक पर्यटक येतात. अनेकांनी या ठिकाणी काही असामान्य घटना घडताना पाहिल्या आहेत. असे म्हटले जाते की तीन राजांनी या चर्चच्या मालमत्तेसाठी लढा दिला आणि एकमेकांना ठार मारले. तेव्हापासून त्यांचा आत्मा चर्चच्या आत फिरत असल्याचे म्हटले जाते.

ट्रेंडिंग न्यूज

२) नॅशनल लायब्ररी, कोलकाता

हे ठिकाण मनोरंजक भूतकथांसाठीही ओळखले जाते. या ग्रंथालयाच्या नूतनीकरणादरम्यान झालेल्या अपघातात सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ही जागा भुताची समजली जाते आणि सुरक्षा रक्षकही येथे नाईट ड्युटी करण्यास तयार नसतात.
वाचा: किचन गार्डनमध्ये असलेल्या रोपांना द्या घरगुती खत, पावसाळ्यात येतील चांगली फळे

३) माहीमची डिसोझा चाळ, मुंबई

हे मुंबईतील एक भयानक ठिकाण आहे. तसेच भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणांमध्ये गणले जाते. मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या डिसोझा चाळीला भुताचे ठिकाण म्हटले जाते.अनेक वर्षांपूर्वी पाणी काढताना एक महिला विहिरीत पडली होती. तिने मदतीसाठी खूप आरडाओरड केली. पण कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही. शेवटी तिचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते ही या महिलेचा आत्मा आजही त्या विहिरीजवळ भटकत आहे.

४) रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद

हे भारतातील सर्वात प्रसिद्ध फिल्म सिटींपैकी एक आहे. मात्र, येथेही काही पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी पाहायला मिळाल्या आहेत. येथे अशी अनेक हॉटेल्स आहेत जिथे राहणाऱ्या लोकांना काही विचित्र गोष्टी जाणवल्या आहेत.
वाचा: महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा द्यायच्यात? दिग्गज नेत्यांच्या खास पोस्ट नक्की पाहा

५) फिरोजशाह कोटला किल्ला, नवी दिल्ली

नवी दिल्लीमधील बहादूरशाह जफर रोडवर असलेला फिरोजशाह कोटला किल्ला देखील भुताचे ठिकाण मानला जातो. या किल्ल्यावरील रात्रीचे वातावरण हे अतिशय भितीदायक असते.

(वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आणि स्थानिक मान्यतांवर आधारित असून, वेबसाईटशी याचा थेट सबंध नाही.)

WhatsApp channel