Lifestyle Stories 18th April: हेरिटेज डे ते ईदची तयारी! वाचा आजच्या टॉप लाइफस्टाइल स्टोरीज-lifestyle stories 18th april ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lifestyle Stories 18th April: हेरिटेज डे ते ईदची तयारी! वाचा आजच्या टॉप लाइफस्टाइल स्टोरीज

Lifestyle Stories 18th April: हेरिटेज डे ते ईदची तयारी! वाचा आजच्या टॉप लाइफस्टाइल स्टोरीज

Apr 18, 2023 09:34 PM IST

जाणून घ्या आरोग्य, सौंदर्य, रेसिपी अशा विविध विषयावरच्या लाइफस्टाइल सेक्शनमधील आजच्या टॉप स्टोरीज...

Lifestyle news in Marathi
Lifestyle news in Marathi (Freepik)

जागतिक हेरिटेज डे हा दिवस १८ एप्रिल १९८३ मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. जगभरातील ऐतिहासिक वास्तू, पुरातत्व स्थळे आणि वास्तूंचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याखेरीज अवघ्या काही दिवसावर ईद आली आहे. या सणाला सेलिब्रेट करण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. याशिवाय तुम्ही फूड, प्रवास, सौंदर्य आणि आरोग्याशी संबंधित इतर टॉप लाइफस्टाइल बातम्याही जाणून घ्या.

World Heritage Day: भारतातील या ५ हेरिटेज साइटला भेट द्यायलाच हवी!

दरवर्षी १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन/ जागतिक हेरिटेज डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील ऐतिहासिक वास्तू, पुरातत्व स्थळे आणि वास्तूंचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी जनजागृती करणे हे हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. भारतात ४० वारसा स्थळे आहेत ज्यांना युनेस्कोने मान्यता दिली आहे. सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र गुणधर्म यासारखे घटक जागतिक वारशाच्या (हेरिटेजच्या) प्रमाणात येतात. हा दिवस १९८३ मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतातील ५ प्रसिद्ध वारसा स्थळांबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Sneezing in Morning: सकाळी उठल्याबरोबर शिंका का येतात? तज्ञांनी सांगितले कारण

शिंका येणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा या शिंका सतत येऊ लागतात तेव्हा त्याचा त्रास होऊ लागतो. बरेच लोक असे असतात ज्यांना सकाळी उठल्यावर सतत अनेक शिंका येतात आणि त्या काही वेळाने आपोआप थांबतात. अशा स्थितीत असे का होते, असा प्रश्न मनात निर्माण होतो. सकाळी खूप शिंका येण्यामागे तज्ञ काही खास कारणे सांगतात. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Eid Fashion: ईदला तयार होण्यासाठी बेस्ट आहेत पाकिस्तानी अभिनेत्रींचे हे सूट डिझाईन, तुम्हीही घ्या टिप्स

रमजान महिना सुरू होताच महिला ईदच्या तयारीला लागतात. घर सजवण्यापासून ते कपड्यांच्या खरेदीपर्यंत त्या बराच वेळ घालवतात. ईद जवळ येताच महिला कपड्यांसोबतच मेकअपचाही विचार करू लागतात. तुम्हाला यावेळी ईदच्या दिवशी लेटेस्ट ट्रेंड फॉलो करायचा असेल, तर तुम्ही पाकिस्तानी अभिनेत्रींचे सूट डिझाइन पाहून टिप्स घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला ट्रेडिशनसोबतच स्टाईलही पाहायला मिळेल. नक्की कोणत्या डिझाइन्स ट्रेंडमध्ये आहेत याबद्दल इथे क्लिक करून जाणून घ्या.

Relationship Tips: आता नातं टिकणार नाही असं दिसतंय? तर या ५ मार्गांनी करा गुडबाय

जबरदस्तीने नाते जोडणे किंवा नको असलेले नाते टिकवणे हे सर्वात कठीण काम आहे. याचा तुमच्या सोशल प्रेजेंस, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. जे लोक तणावग्रस्त असतात ते आनंदी लोकांपेक्षा जास्त आजारी असतात. म्हणूनच हे महत्वाचे आहे की जेव्हा तुम्हाला हे समजते की तुम्ही नाते पुढे चालू ठेवू शकणार नाही, तेव्हा पुढे जाण्यास हरकत नाही. तुम्हाला मदत करण्यासाठी, एक्सपर्ट टिप्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Aloo Poha Cutlet Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा बटाटा पोहा कटलेट! जाणून घ्या सोपी रेसिपी

सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळच्या चहासोबतचा नाश्ता असो, नाश्त्यात काय नवीन बनवायचे याचा रोज विचार करावा लागतो. पण आम्ही आज अशा एका रेसिपीबद्दल सांगणार आहोत, जी झटपट तयार करता येते. तुम्ही पोहे बनवतच असाल, पण बटाटा पोहा कटलेटचे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? हे पोहे आणि बटाटे एकत्र करून बनवले जाते. सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हे कटलेट खाल्ले जाऊ शकते. हे बनवायला खूप सोपे आहे आणि वेळही कमी लागतो. रेसिपी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Whats_app_banner
विभाग